शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
3
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
4
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
5
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
6
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
7
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
8
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
9
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
10
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
11
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
12
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
13
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
14
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
15
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
16
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
17
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
18
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
19
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
20
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!

मोदी सरकारला शाबासकी

By admin | Updated: June 5, 2015 01:14 IST

भारतात जे बदल होत आहेत त्यामुळे जगात देशाचे स्थान व प्रतिष्ठा वाढत आहे,या शब्दांत खुद्द सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीच सरकारला शाबासकीची थाप दिली आहे.

नागपूर : मोदी सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे समाधान व्यक्त करण्यात आले आहे. भारतात जे बदल होत आहेत त्यामुळे जगात देशाचे स्थान व प्रतिष्ठा वाढत आहे,या शब्दांत खुद्द सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीच सरकारला शाबासकीची थाप दिली आहे. संघाच्या तृतीय वर्ष शिक्षा वर्गाचा गुरुवारी सायंकाळी रेशीमबाग मैदान येथे समारोप झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे मुख्य अतिथी कर्नाटकच्या धर्मस्थळ येथील धर्माधिकारी डॉ.वीरेंद्र हेगडे, डॉ.मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. सत्ताबदलानंतर देशात सकारात्मक बदलांचा जनतेला अनुभव होत आहे. जगात भारत क्रमांक एकवर नसला तरी आपल्याबद्दल इतर देशांच्या आशाआकांक्षा वाढल्या आहेत. जगाला भारताबाबत विश्वास आहे व भविष्यातील महाशक्ती म्हणून भारताचेच नाव सर्वात प्रथम घेतल्या जात आहे. आपल्या देशाकडून स्वत:च्या स्वार्थाचा ‘अजेंडा’ कधीही राबविण्यात आलेला नाही. देश मोठा होत आहे, कारण येथे तसे कर्तृत्व असणाऱ्या व्यक्ती आहेत, असे डॉ. भागवत म्हणाले. मी गेल्या अनेक वर्षांपासून देशात होणारे बदल पाहतो आहे. येथे सर्वसमानतेचा भाव वाढत आहे. राजकीय पक्षांनी आपापल्या भूमिका सांभाळायला पाहिजेत. परंतु देशहितासाठी राष्ट्रीयभावाला प्राधान्य देत सर्वांनी एकत्रित यायला हवे, असे मत डॉ.हेगडे यांनी व्यक्त केले. यावेळी मंचावर वर्गाचे सर्वाधिकारी गोविंदसिंह टांक, महानगर संघचालक राजेश लोया हे उपस्थित होते. या कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय माहिती व नभोवाणी राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड आदी उपस्थित होते. यंदाचा तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्ग ११ मे पासून सुरू झाला. या वर्गात देशभरातून १८ ते ४० वर्षे वयोगटातील ८७६ स्वयंसेवक सहभागी झाले होते. या स्वयंसेवकांनी सुरुवातीलाविविध शारीरिक प्रात्यक्षिके सादर केली. यानंतर घोष प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली. (प्रतिनिधी)सर्वसमानतेचा भाव मी गेल्या अनेक वर्षांपासून देशात होणारे बदल पाहतो आहे. येथे सर्वसमानतेचा भाव वाढत आहे. राजकीय पक्षांनी आपापल्या भूमिका सांभाळायला पाहिजेत. परंतु देशहितासाठी राष्ट्रीयभावाला प्राधान्य देत सर्वांनी एकत्रित यायला हवे, असे मत डॉ.हेगडे यांनी व्यक्त केले.