मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकारी संमेलनात बोलताना नरेंद्र मोदींवर कोणत्याही प्रकारची टीका केली नाही. सोशल मिडिया संदर्भाथ ‘ते’ विधान होते, असा खुलासा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केला. विले पार्ले येथे मुंबईतील पहिल्या मोफत वाय-फाय सेवेच्या शुभारंभानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज म्हणाले की, मोदींची हवा ओसरली बगैरे विधान केलेले नाही. केवळ सोशल मिडियाच्या आहारी जावू नका प्रत्यक्ष लोकांची कामे करा, असे विधान होते. माझी टीका सोशल मिडियावर होती मोदींवर नव्हती. मोदींवर टीका करायचीच असेल तर जाहीरपणे करेन, असे ठाकरे म्हणाले. दोन महिन्यांपूर्वी मोदींचे गुणगान करणा-या सोशल मिडियावर आता त्यांच्या विरोधी विनोद फिरु लागले आहेत. हे सांगताना ‘तो’ विनोद सांगितला. यात मोदींची लाट ओसरली वगैरे मुद्दाच नव्हता, असे राज म्हणाले. (प्रतिनिधी)
मोदींवर टीका केली नाही - राज
By admin | Updated: July 14, 2014 04:02 IST