शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

‘कॉमन मॅन’ला भावले मोदी

By admin | Updated: August 22, 2014 01:34 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपुरातील पहिल्या भाषणातून शहरवासीयांना अनेक आशा-अपेक्षा होत्या. मोदी यांच्या भाषणानंतर त्या पूर्ण झाल्या की निराशा हाती आली, या विषयी अनेकांना बोलते केले.

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपुरातील पहिल्या भाषणातून शहरवासीयांना अनेक आशा-अपेक्षा होत्या. मोदी यांच्या भाषणानंतर त्या पूर्ण झाल्या की निराशा हाती आली, या विषयी अनेकांना बोलते केले. त्यावेळी काहींनी मोदींनी भाषणातून सामान्यांना जिंकले तर काहींनी स्वतंत्र विदर्भावर बोलायला हवे होते, अशा प्रतिक्रिया दिल्या. देशाची काळजी जाणवलीपंतप्रधान मोदी यांच्या भाषणातून देशाची काळजी जाणवली. सामान्य माणसाला हेच अपेक्षित आहे. त्यांनी नष्ट होत चाललेली शेती, भ्रष्टाचार, बेरोजगारीवर बोट ठेवले.-फिरोज अन्सारी बेरोजगारांना दाखविले आशेचे किरणमोदीजींनी आपल्या भाषणात विकासाला महत्त्व दिले. सोबतच त्यांनी कमी शिक्षण घेतलेल्या बेरोजगारांना आशेचा किरणही दाखविला. स्वत:च्या कलागुणांच्या जोरावर नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे शक्य आहे, असा सकारात्मक संदेश दिला.-मोहम्मद जकीमहागाईवर बोलायला हवे होतेमोंदीजींचे भाषण ऐकण्यासाठी फार उत्सुक होतो. परंतु आज त्यांचे भाषण नेहमीप्रमाणे झालेले नाही. त्यांनी देशातील वाढत्या महागाईवर बोलायला हवे होते. -दिगंबर जोशीभाषणात एकसूरपणा होतापंतप्रधानाचे आजचे भाषण रटाळ होते. नेहमीचा एकसूरपणा होता. त्यामुळे अनेक लोक त्यांचे भाषण सुरू झाल्यानंतर दहा मिनिटात बाहेर पडायला लागले.-संजय कटरेविदर्भावर बोलायला हवे होतेआजच्या घडीला संपूर्ण विदर्भ वेगळ्या विदर्भाच्या प्रतीक्षेत आहे. या धर्तीवर त्यांनी आपल्या भाषणात विदर्भाविषयीचे मत मांडायला हवे होते. विदर्भवाद्यांची घोर निराशा झाली.-उमेश नारनवरेभ्रष्टाचाराचा मुद्दा उचललादेश भ्रष्टाचाराने पोखरून निघाला आहे. मोदीजींनी आपल्या भाषणात हा मुद्दा उपस्थित करून उपस्थितांची मने जिंकली. ते म्हणाले, या विषयी मी सामान्य लोकांसोबत आहे. त्यामुळे ज्यांना स्वत:ला बदलायचे आहे त्यांनी बदलावे, असा इशाराही दिला.- जय चव्हाणओजस्वी भाषण नव्हतेपंतप्रधानांचे भाषण ओजस्वी असेच असावे. परंतु आजच्या भाषणात अनेक उणिवा होत्या. त्यांना येथील समस्या माहीत नसल्याचे दिसून आले. त्यांनी महागाई व बेरोजगारीवर बोलायला हवे होते. -रेणुका चव्हाणविकासावर भरभरून बोललेविकासावर मोदीजी भरभरून बोलले. त्यांच्या भाषणात देशातील ५०० शहरांचा विकासापासून ते कृषीचा विकास हाच उद्देश असल्याचे दिसून आले. भ्रष्टाचारावरही सडकून टीका केली.- सचिन रानडेमोठा दिलासा मिळाला‘पिछले साठ साल मे जिसको मौका मिला उसने धोका दिया’ हे त्यांच्या भाषणातील वाक्य बरेच काही सांगून गेले. एक मोठा दिलासा सामान्य माणसाला मिळाला.-श्रुती खोब्रागडेविदर्भाची घोषणा हवी होतीमोंदींनी आपल्या भाषणात स्वतंत्र विदर्भाची घोषणा करायला हवी होती. त्यांच्या पक्षाचीही हीच मागणी आहे. -सुनील जवादे