शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

‘आॅनलाइन पोलिसिंग’द्वारे पुण्याच्या पोलीस दलाला आधुनिक चेहरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:31 IST

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुणे पोलीस दल अधिकाधिक ‘नेट सॅव्ही’ आणि जलद करण्यासाठी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या संकल्पनेमधून पोलिसांनी नागरिकांसाठी विविध पोर्टल्स सुरू केले आहेत.

पुणे : अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुणे पोलीस दल अधिकाधिक ‘नेट सॅव्ही’ आणि जलद करण्यासाठी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या संकल्पनेमधून पोलिसांनी नागरिकांसाठी विविध पोर्टल्स सुरू केले आहेत. नागरिकांना तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यापर्यंत जाण्याची वेळच येऊ नये, या दृष्टीने पोलीस दल पावले टाकत आहे. फेसबुक, टिष्ट्वटरचाही वापर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर सुरूकेला असून, जनसंपर्कासोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक सौहार्द, कायदा सुव्यवस्था टिकविण्यासाठी ‘आॅनलाइन पोलिसिंग’चा उपयोग होत आहे.शुक्ला यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पोलीस दलाला आधुनिक चेहरा देण्यासाठी नवनविन संकल्पना राबवायला सुरुवात केली. पारंपरिक कामासोबतच तंत्रज्ञानाचा खुबीने वापर करण्यात आला असून गेल्या दीड वर्षामध्ये फेसबुक आणि टिष्ट्वटरसह विविध पोर्टलच्या माध्यमातून लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे काम सुरू आहे. यासोबतच पुणे पोलिसांच्या नवीन संकेतस्थळासह एम-पासपोर्टच्या माध्यमातून जलद पडताळणी आणि वाहतूक दंडवसुलीसाठी ‘ई-चलान’ पद्धती सुरू केल्याने कामाचा वेळही वाचला आहे. सध्याची तरुणाई सतत ‘आॅनलाइन’ असते. जगातील सतत घडणारे ‘अपडेट’ त्यांच्या स्मार्ट फोनद्वारे बोटांवर नाचत असतात. यासोबतच अल्पशिक्षित, सुशिक्षित, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते, महिला मंडळे, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, संशोधक, शिक्षक, प्राध्यापक, वकील, डॉक्टर्स, इंजिनिअर्स, शासकीय कर्मचारी, अधिकारी, आयटीयन्स अशा जवळपास सर्वच क्षेत्रांतील नागरिकांच्या हातामध्ये सध्या स्मार्टफोन आणि त्यावर इंटरनेट वापरले जात आहे. स्मार्टफोनमधील ‘प्ले स्टोअर’मध्ये गेम्सपासून ते जीवन उपयोगी गोष्टींची माहिती देणारे ‘अ‍ॅप्स’ उपलब्ध आहेत. त्याचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्रामसारख्या मेसेजिंग अ‍ॅप्सद्वारे जग अधिक जवळ आले आहे.नागरिकांकडून होणारा या अ‍ॅप्सचा वापर आणि त्याकडे असणारा ओढा लक्षात घेता पोलिसांनाही आॅनलाइन येणे भाग पाडले आहे. पोलिसांच्या दैनंदिन कामाची पद्धत अनेक वर्षांपासून तशीच आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचारी अनेकदा पठडीबाहेर जाऊन काम करत नाहीत. अजूनही पारंपरिक पद्धतीने त्यांचे काम चालत असल्याने बदलत्या काळामध्ये पोलीस दल मागे पडत आहे की काय, असे वाटत राहते. तंत्रज्ञानाचा ज्या प्रमाणात विकास आणि प्रसार होत चालला आहे. त्याप्रमाणात पोलीस दलामध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला जात नाही. तत्कालीन पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी पोलीसमित्र आणि प्रतिसादसारखे मोबाईल अ‍ॅप आणले होते. या अ‍ॅप्सच्या माध्यमातून त्यांनी लोकांना पोलीस दलाशी जोडण्याची नवी संकल्पना मांडली होती. त्याला राज्यभरामधून चांगला प्रतिसादही मिळाला होता.‘आॅनलाइन पोलिसिंग’ ही काळाची गरज बनली आहे. नागरी सहभागाशिवाय; तसेच दांडग्या जनसंपर्काशिवाय पोलिसांना काम करणे शक्य नाही. त्यामुळे अधिकाधिक लोकांशी जोडले जाणे क्रमप्राप्त झाले आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रतिष्ठित नागरिकांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप करून त्यावर पोलिसांच्या कामाची माहिती देणेही सुरू आहे. आॅनलाइन पद्धतीने पोलिसांशी जोडले जाणे, त्यांच्या कामात सहभाग नोंदविणे, अडचणीच्या काळात मदत मागिविणे मदत मागविणे, महिला सुरक्षा यासाठी या अ‍ॅप्सचा उपयोग होत आहे. धार्मिक विद्वेष पसरविण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्याला पोलीसही सोशल मीडियाच्याच माध्यमातून उत्तर देत असून, हळूहळू का होईना, पण होणारा हा बदल आगामी काळात पोलीस दलाचा चेहरा बदलून टाकणार आहे.>सिटी सेफनोकरदार महिलांसह सर्वसामान्य महिलांनाही संकटाच्या काळामध्ये पोलिसांकडे थेट तक्रार करता यावी, तसेच मदत मागता यावी, याकरिता पुणे पोलिसांकडून सिटीसेफ अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. मोबाईलमध्ये हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर थेट जीपीएसशी जोडले जाणार आहे. त्यामुळे तक्रारदार महिलेचे नेमके ‘लोकेशन’ समजू शकणार आहे. तक्रार प्राप्त होताच जवळच्या पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस नियंत्रण कक्षापर्यंत मेसेज जाईल. त्यामुळे संबंधित महिलांना मदत मिळणे अधिक सोपे होणार आहे.ई-चलानद्वारे दंडवसुलीााहतूक पोलिसांना ई-चलान सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यंत्राच्या माध्यमातून जागेवरच दंडवसुली केली जात आहे. वारंवार नियमभंग करणाºयांची माहितीही या यंत्रामध्ये असल्याने वाहनचालकांना जरब बसू लागली आहे. कॅशलेस पद्धतीने ही दंडवसुली वाढली.पुणे पोलीस टिष्ट्वटरवर आले असून, नागरिक या अकाऊंटवर टिष्ट्वट करून तक्रार अथवा माहिती दिली जात आहे. एका स्मार्ट शहरासाठी स्मार्ट पोलीस हवेच, असे ब्रीदवाक्य या अकाऊंटवर पाहायला मिळते. यासोबतच पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांचेही टिष्ट्वटर अकाऊंट सुरू करण्यात आलेले आहे.एम-पासपोर्टद्वारेपोलीस पडताळणीपासपोर्टसाठी पोलीस पडताळणीसाठी अर्जदाराला पोलीस ठाण्यात मारायला लागणाºया फेºया बंद झाल्या असून आता थेट पोलीस कर्मचारीच अर्जदाराच्या घरी जाऊन छायाचित्रासह कागदपत्रे व इतर पडताळणी करीत आहेत.पोलिसांना त्यासाठी टॅब उपलब्ध करून देण्यात आले असून ही प्रक्रिया डिजिटल असल्याने पडताळणीचा कालावधी कमी झाला आहे. छायाचित्र, कागदपत्रांचे स्कॅनिंग या बाबी जागेवरच होत आहेत.लॉस्ट अ‍ॅन्ड फाऊंड : पुणे पोलिसांच्या संकेतस्थळाद्वारे या पोर्टलचे काम सुरू आहे. या पोर्टलवर नागरिक त्यांच्या हरवलेल्या वस्तूंबाबत तक्रार दाखल करू शकतात. या अ‍ॅपचा आजवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर वापर केलेला असून गणेशोत्सवामध्ये नागरिकांनी या पोर्टलवरच तक्रारी दाखल केल्या.भाडेकरू माहिती देण्यासाठी पोर्टल : एरवी पोलीस ठाण्यात जाऊन भाडेकरूची माहिती देणे बंधनकारक आहे. मात्र, या पोर्टलच्या माध्यमातून आॅनलाइन पद्धतीने भाडेकरूची माहिती देणे सोपे झाले आहे. भाडेकरू आणि जागामालकाची माहिती आता आॅनलाइन झाल्याने अनेकांचा त्रास आणि वेळ दोन्हीही वाचले आहे.

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीस