शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान संतापला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
3
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
4
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
5
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
6
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
7
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
8
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
9
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
10
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
11
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
12
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
13
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
14
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
15
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 
16
आधीच्या ओबीसी आरक्षणानुसार ४ महिन्यांत निवडणुका घ्या; मिनी विधानसभेचा मार्ग मोकळा
17
पदवीसाठी २७ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी ; उद्यापासून प्रवेश
18
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
19
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
20
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन

घोकंपट्टीचा अभ्यासक्रम बदलणार

By admin | Updated: June 16, 2017 00:23 IST

दहावीच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी १००पैकी १०० गुण मिळवल्याने राज्याच्या शिक्षणपद्धतीवर चर्चा सुरू झाली आहे. ती योग्यच आहे. पण, नीट आणि जेईई परीक्षांचा निकाल

- लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : दहावीच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी १००पैकी १०० गुण मिळवल्याने राज्याच्या शिक्षणपद्धतीवर चर्चा सुरू झाली आहे. ती योग्यच आहे. पण, नीट आणि जेईई परीक्षांचा निकाल चांगला लागायला हवा असेल; तर सध्याचा घोकंपट्टीचा अभ्यासक्रम बदलणे अपेक्षित आहे. त्यासाठी दहावी व बारावीचा परीक्षा पॅटर्न बदलावा लागेल. तो बदलण्यापूर्वी अभ्यासक्रम बदलायला हवा. शिक्षणतज्ज्ञांच्या शिफारशीनुसार तो २०१९मध्ये बदलला जाईल, अशी माहिती राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि राज्यात शाळेच्या पहिल्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या प्रवेशोत्सवानिमित्त ते बोलत होते. कल्याणच्या के.सी. गांधी शाळेत गुरुवारी आयोजित शैक्षणिक कार्यक्रमात त्यांनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाददेखील साधला. या वेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, आमदार नरेंद्र पवार, गणपत गायकवाड, महापौर राजेंद्र देवळेकर, शिक्षण सभापती वैजयंती घोलप, के.सी. गांधी विद्यालयाचे अध्यक्ष अशोक प्रधान आदी मान्यवर उपस्थित होते. नीट आणि जेईईच्या परीक्षांबाबत सरकारने न्यायालयात आपली बाजू योग्य प्रकारे मांडली होती, असे सांगून तावडे म्हणाले, शैक्षणिक बदल हा विजेचे बटण दाबावे, तसा होत नाही. दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम बदलण्यापूर्वी आधी नववी आणि अकरावीचा अभ्यासक्रम बदलावा लागेल. ही प्रक्रिया २०१८मध्ये होईल. त्यानंतर, २०१९मध्ये दहावी व बारावीचा अभ्यासक्रम बदलता येईल.