शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

महावितरणकडून ग्राहकांसाठी मोबाईल अ‍ॅप

By admin | Updated: December 26, 2016 01:59 IST

वीजबिल संदर्भात ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कधीकधी वीजबिल मिळत नाही.

भूगाव : वीजबिल संदर्भात ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कधीकधी वीजबिल मिळत नाही. मुदत संपल्यावर बिल येते. वीजबिल भरायचे लक्षात राहत नाही आदी समस्यांवर महावितरण कंपनीने उपाय शोधला आहे. कंपनीने ग्राहकांसाठी नवीन एसएमएस व मोबाईल अ‍ॅप सेवा सुरू केली आहे.मुळशी उपविभागामधे मुळशी, माणगाव, वेल्हा, हवेली हे तालुके येतात. यात सुमारे घरगुती, व्यापारी व औद्योगिक याचे ४९ हजार ५०० तर कृषिपंपाचे ३ हजार ५०० असे एकूण ५३ हजार ग्राहक आहेत. या योजनेस चांगला प्रतिसाद मिळत असून, विभागात आतापर्यंत एकूण ग्राहकांपैकी २४ हजार ८०० म्हणजेच जवळपास ४७ टक्के ग्राहकांनी नोंदणी केली आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे महावितरण कर्मचाऱ्यांना मिटर रिडींग घेणे, वीजबिल वाटप करणे जमत नाही. यामुळे बिले वेळेत भरली जात नाहीत, अशा अनेक कारणांमुळे अनेक वेळा दंड किंवा वीज कनेक्शन तोडली जाते. त्यामुळे अनेक ग्राहक हैराण होत होते. ही समस्या लक्षात घेऊन महावितरण कंपनीने रिडींग पाठवण्याची सुविधा केल्यामुळे विजबिलात कधीच चूक होणार नाही. वीजबील दुरुस्तीसाठी वारंवार कार्यालयात येण्याची गरज भासणार नाही. ग्राहकांना घरबसल्या माहिती आपल्या मोबाईलवर मिळेल. या दोन्ही सेवेतून ग्राहकांना वीजबिल तयार झाले की बिलाची रक्कम, बिल भरण्याची अंतिम मुदत, मागील थकीत रक्कम असेल तर त्यांच्या माहितीचा मेसेज येणार असून बिल भरण्यासाठी एसएमएसद्वारे कळवण्यात येईल. याचबरोबर तांत्रिक बिघाड, दुरुस्ती यासाठी वीजपुरवठा किती वेळ खंडित राहिल, हा पुरवठा कधी पूर्ववत होईल या संदर्भात माहितीसुद्धा दिली जाईल. यामुळे ग्राहक व शेतकऱ्यांना या काळातील कामांचे व शेतीला पाणी देण्याचे नियोजन किंवा यावर पर्यायी व्यवस्था करता येईल. वीज ग्राहकांच्या मोबाईलची नोंदणीची मोहीम सुरू झाली असून मुळशी उपविभागात ५८ टक्के ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी झाली आहे. उर्वरित ग्राहकांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी मोबाइल अ‍ॅपद्वारे, एसएमएसद्वारे,अथवा उपविभागीय कार्यालयाशी संपर्क करावा. वीजबिलाच्या मागे याबद्दल अधिक माहिती दिलेली आहे.- फुलचंद फड, उपकार्यकारी अभियंता, मुळशीमहावितरण अ‍ॅप : महावितरण कंपनीने मोबाईलसाठी ‘महावितरण’ अ‍ॅप सुरू केले आहे. या अ‍ॅपवर मीटर रिडींग पाठवण्याची सुविधा, नवीन वीजजोडणीसाठी अर्ज नोंदणी, वीजबिलाचा तपशील तसेच वीजबिल भरण्याची सुविधा, वीजेसंबंधी तक्रार, नोंदणी आणि तक्रारींचा पाठपुरवठाही या अ‍ॅपवर करण्यात येईल. हे अ‍ॅप मराठी व इंग्रजी भाषेतून उपलब्ध आहे. अँड्रॉईड, आयओएस, विंडोज अ‍ॅप्लीकेशनवरून हे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करावे.