शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

जमावाकडून आंदोलनकर्त्यांना मारहाण, परिसरात तणाव

By admin | Updated: January 31, 2017 17:30 IST

प्रादेशिक परिवहन विभागाच्या शुल्कवाढीच्या विरोधात रिक्षा संघटनांनी एकदिवसीय राज्यव्यापी बंदची हाक

ऑनलाइन लोकमतकोल्हापूर, दि. 31 - प्रादेशिक परिवहन विभागाच्या शुल्कवाढीच्या विरोधात रिक्षा संघटनांनी एकदिवसीय राज्यव्यापी बंदची हाक दिली असताना कसबा बावडा भगवा चौकात रस्त्यावर फिरणाऱ्या रिक्षाची चार-पाच आंदोलकांनी तोडफोड केली. यावेळी बावड्यातील स्थानिक पाचशे जणांच्या जमावाने आंदोलकांची धरपकड करीत बेदम मारहाण केल्याने तणाव पसरला. मंगळवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराने शाहूपुरी पोलिसांनी धाव घेत जमावाला पिटाळून लावले. अधिक माहिती अशी, रिक्षा संघटनांचा मंगळवारी राज्यव्यापी बंद होता. त्यामुळे शहरात रस्त्यावर सोमवारी मध्यरात्रीपासून एकही रिक्षा फिरत नव्हती. सकल मराठा समाजाचे चक्काजाम आंदोलन सुरू असल्याने रस्त्यावर नागरिकांची वर्दळ होती. कसबा बावडा पॅव्हेलियन मैदानावर क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. या ठिकाणी कृष्णात शंकरराव काशिद (रा. कवडे गल्ली) यांचा सरबत-लस्सीचा गाडा आहे. मंगळवारी सकाळी घरातून साहित्य घेऊन ते आपल्या रिक्षातून (एमएच ०९ क्यू-९७९०) मधून मैदानाकडे निघाले होते. भगवा चौकात येताच मोटरसायकलवरून आलेल्या चार-पाच कार्यकर्त्यांनी त्यांना अडविले. बंद पुकारला असताना तुम्ही रिक्षा बाहेर का काढली म्हणून त्यांना जाब विचारला. यावेळी काशिद यांनी मी प्रवासी वाहतूक करीत नाही. माझा सरबत-लस्सीचा व्यवसाय आहे. साहित्य घेऊन चाललोय असे सांगितले. त्यांचे बोलणे ऐकण्याच्या मनस्थितीत ते नव्हते. त्यांनी दगड घालून रिक्षाची दर्शनी काच फोडली. भर चौकात वादावादीचा प्रकार पाहून बावड्यातील पाचशे तरुणांचा जमाव चौकात आला. आंदोलकांच्यातील तिघा-चौघांनी मद्यप्राशन केल्याचे लक्षात येताच जमावाने या सर्वांची इथेच्छ धुलाई केली. या प्रकाराची माहिती समजताच पोलिसांचा फौजफाटा चौकात आला. त्यांनी सर्वांना पिटाळून लावले. यावेळी रिक्षा फोडणारे व मार खाणारे आंदोलनकर्तेही पसार झाले. त्यानंतर काशिद हे रिक्षा घेऊन मैदानावर गेले. रिक्षाची तोडफोड करणारे आंदोलनकर्ते हे शहरातील असल्याची घटनास्थळी चर्चा होती. पोलिसांनाही त्यांची नावे माहिती नव्हती.