शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बाळा नांदगावकरांच्या मूक संवादाने मनसेत कुजबुज

By admin | Updated: January 16, 2015 06:05 IST

मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर यांच्या फेसबुकवरील पोस्टमुळे पक्षात वेगळीच कुजबुज सुरू झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मुंबई : मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर यांच्या फेसबुकवरील पोस्टमुळे पक्षात वेगळीच कुजबुज सुरू झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या छायाचित्र प्रदर्शनास नांदगावकर यांनी एकट्याने भेट दिली व त्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रासोबत काढलेला फोटो फेसबुकवर पोस्ट करून त्यांच्याशी मूक संवाद साधल्याचे म्हटले आहे!नांदगावकर हे विधानसभेतील मनसेचे गटनेते होते. विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. तेव्हापासून मनसेतील त्यांचे महत्त्व कमी झाल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांत नांदगावकर हे राज यांच्यासोबत दिसत नाहीत. दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याची मागणी केली तेव्हा नांदगावकर यांच्याऐवजी अभिजित पानसे हे राज यांच्यासोबत होते. विधानसभेत गटनेते असताना विषय टोलचा असो की मराठी अस्मितेचा राज यांच्या शिष्टमंडळात त्यांच्यासोबत नांदगावकर हे उपस्थित असत. राज यांनी उद्धव यांच्या छायाचित्र प्रदर्शनास भेट दिली तेव्हाही नांदगावकर त्यांच्या सोबत नव्हते. नंतर नांदगावकर एकटे प्रदर्शनास भेट देऊन आले. तेथे त्यांनी बाळासाहेबांच्या छायाचित्रांसोबत फोटो काढले आणि तेच फेसबुकवर पोस्ट केले. ‘बाळासाहेबांशी मूकसंवाद’ अशी फोटोओळही त्यास जोडली आहे.विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मनसे नेत्यांच्या झालेल्या बैठकीत प्रवीण दरेकर यांनी पक्षाच्या प्रचार धोरणावर टीका केली होती. यामुळे नांदगावकर व दरेकर यांच्यात खटका उडाला होता. त्यानंतर दरेकर हे पक्षापासून दुरावले. वसंत गीते यांच्या मनाविरुद्ध नाशिकमध्ये नियुक्त्या केल्याने ते दुखावले. यामुळे दरेकर व गीते यांनी मनसेला रामराम करून भाजपात प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर नांदगावकर यांच्या या पोस्टने मनसेत त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेला उधाण आले आहे. (विशेष प्रतिनिधी)