शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचा पुण्यातील 'स्मार्ट सिटी' प्रस्तावाला पाठिंबा

By admin | Updated: December 14, 2015 17:33 IST

स्मार्ट सिटी योजना फसवी असल्याचे सांगत या योजनेला कडाडून विरोध दर्शवणा-या मनसेने घूमजाव करत पुण्यातील प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला आहे.

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. १४ - स्मार्ट सिटी योजना फसवी असल्याचे सांगत या योजनेला कडाडून विरोध दर्शवणा-या मनसेने घूमजाव करत पुणे स्मार्ट सिटीच्या केंद्राकडे पाठवण्याच्या प्रस्तावास पाठिंबा दर्शवला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मनसेने या प्रस्तावाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. 
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करुन सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन 'स्मार्ट सिटी'च्या प्रस्तावातील त्रुटी दूर कराव्यात अशी मागणी केली. त्यावर सर्व पक्षांशी चर्चा करून आपण योग्य कार्यवाही करू अशे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरे यांना दिले. त्यानंतर 'मनसे'नी  'स्मार्ट सिटी'ला पाठिंबा दिल्याचे जाहीर केले.
पुण्याचा समावेश "स्मार्ट सिटी"च्या पहिल्या यादीत व्हावा, यासाठी महापालिकेने केलेला आराखडा पुढे ढकलण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेने घेतला होता. मात्र राज्य सरकारने आदेश काढून याबाबतचा निर्णय घ्यावा, असा आदेश दिला होता. त्यानुसार महापालिकेच्या आज (सोमवारी) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत त्याची मांडणी होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी आराखडा मंजूर करण्याचा आदेश महापालिकेतील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. मात्र, त्यांचे काही आक्षेप होते. शिवसेनेनेही काही बदल सुचविले होते.
यापूर्वी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान स्मार्ट सिटी योजनेवर टीका केली होती. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आणलेली ‘स्मार्ट सिटी’ योजना फसवी असून, केवळ राजकीय फायद्यासाठी ही योजना आणण्यात आल्याचे त्यांनी म्हटले होते.