नाशिक : मनसे आणि भाजपा युतीचा पॅटर्न उदयास आलेल्या नाशिकमध्ये आता महापौर निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मनसे यांची गट्टी झाली आहे. शिवसेना-भाजपा महायुतीला झटका देण्यासाठी हे तिन्ही पक्ष एकत्र आले असून तशी औपचारिक बैठक गुरूवारी झाली. मात्र महापौरपद कोणी भूषवायचे याबाबत निर्णय झालेला नाही. नाशिक महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक आज होणार आहे. सर्वाधिक ४० जागा मिळविणाऱ्या मनसेला भाजपाने टेकू दिल्याने महापौरपद मिळाले. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने मनसेला धक्का देत पारंपरिक सहकारी शिवसेनेशी संधान साधले. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे एकत्र येत बैठक झाल्याचे राष्ट्रवादी माजी खासदार समीर भुजबळ यांनी सांगितले. तर राष्ट्रवादीचा प्रस्ताव राज ठाकरेंकडे पाठविल्याचे मनसेचे आमदार वसंत गिते यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मनसे-राष्ट्रवादी-काँग्रेसची गट्टी
By admin | Updated: September 12, 2014 02:20 IST