शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

"परप्रांतीयांची स्तुती कसली करता?; तुम्ही महाराष्ट्राचे खासदार आहात"; मनसेनं अरविंद सावंतांना सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 16:29 IST

अरविंद सावंत यांच्या या भूमिकेवर मनसेनं टीकास्त्र सोडलं असून, काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

मुंबईः लॉकडाऊनच्या काळात पुन्हा एकदा शिवसेना आणि मनसे आमनेसामने आले आहेत. सोशल मीडियावर अरविंद सावंतांचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लागलीच मनसेनं शिवसेनेवर बाण सोडले आहेत. दक्षिण मुंबईचे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या एका व्हिडीओमध्ये ते परप्रांतीय मजुरांचे कौतुक करताना दिसत आहेत. अरविंद सावंत यांच्या या भूमिकेवर मनसेनं टीकास्त्र सोडलं असून, काही प्रश्न उपस्थित केले आहेत. मनसेचे सरचिटणीस आणि नेते नितीन सरदेसाई यांनी अरविंद सावंत यांना कोंडीत पकडलं आहे. परप्रांतीय मजुरांची स्तुती करून तुम्ही राज्यातील तरुणांच्या काम करण्याच्या क्षमतेवर सवाल उपस्थित केला आहे. तुम्ही परप्रांतीय मजुरांना महाराष्ट्रात येण्यास सांगत आहात, पण तुम्हीसुद्धा महाराष्ट्राचे मुंबईचे खासदार आहात हे विसरू नका, असा दमच मनसेनं भरला आहे. “तुम्ही महाराष्ट्रातील तरुणांची हेटाळणी करताय आणि परप्रांतीयांचे गोडवे गाताय. आपल्या मुलाला ‘कार्टा’ आणि दुसऱ्याच्या मुलाला ‘बाब्या’ बोलणं बंद करा”, असे सरदेसाई म्हणाले आहेत. “अरविंदजी तुम्ही महाराष्ट्रातल्या मुंबईचे खासदार आहात. दिल्लीत महाराष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी तुम्हाला तिकडे पाठवलं आहे. यापुढे परप्रांतीयांचे गोडवे गाणं बंद करा आणि महाराष्ट्रातील मुलं व्यवसायात कशी पुढे जातील यासाठी प्रयत्न करा,” असा सल्ला नितीन सरदेसाई यांनी दिला आहे.

आपण महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांच्या रोजगाराच्या संधीचा विचार केला पाहिजे. तो न करता परप्रांतीय किती चांगलं काम करतात याची स्तुती कशी काय करता?, असा सवालही नितीन सरदेसाईंनी विचारला आहे. कोरोनाच्या संकटामुळे परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यात निघून गेले आहेत. त्यामुळे इथल्या तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. आपण महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे. पण तुम्ही त्यांची अवहेलना करताय, हे चुकीचं असल्याचंही सरदेसाई यांनी अधोरेखित केलं आहे. 

हेही वाचा

आता चीनचं 'टेन्शन' वाढणार, भारताची ताकद पहिल्यांदाच रशियात दिसणार!

भारत-नेपाळमध्ये रोटी-बेटीचं नातं, जगातील कोणतीही ताकद ते तोडू शकत नाही- राजनाथ सिंह

आठ वर्षे विम्याचे हप्ते भरल्यास विमा कंपनीला द्यावा लागणार क्लेम, Irdaiचे आदेश

पोस्टाच्या सहा जबरदस्त योजना; लॉकडाऊनच्या काळात गुंतवणूक करा अन् मिळवा मोठा लाभ

टॅग्स :MNSमनसेShiv Senaशिवसेना