शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackeray: “१०० वर्ष एकच ध्यास, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज”; राज ठाकरेंची बाबासाहेबांना आदरांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 18:41 IST

Raj Thackeray: बाबासाहेब पुरंदरेंसारखा ‘शिव’भक्त होणे नाही, या शब्दांत राज ठाकरे यांनी आदरांजली वाहिली.

Raj Thackeray: मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार, वक्ते आणि शिवशाहीर म्हणून प्रसिद्ध असलेले बळवंत मोरेश्वर पुरंदरे ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांचा पहिला स्मृतिदिन आहे. गेल्या वर्षी वयाच्या १०० व्या वर्षी बाबासाहेब पुरंदरे यांनी जगाचा निरोप घेतला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत आदरांजली वाहिली आहे.  

राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये राज ठाकरे म्हणतात की, बाबासाहेब पुरंदरेंचा पहिला स्मृतिदिन. आयुष्याची १०० वर्ष ते एकच ध्यास घेऊन जगले, तो ध्यास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बाबासाहेबांच्या मुखातून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ऐकताना त्यातली उत्कटता मनाला भिडायची, जसं लतादीदींचं गाणं आर्त वाटतं तशीच ही अनुभूती असायची. ही उत्कटता, आर्तता ही एका जन्मात येऊ शकत नाही. बाबासाहेबांची छत्रपती शिवाजी महाराजांवरची भक्ती ही अनेक जन्मांची असणार. ही श्रद्धाच त्यांच्या आयुष्याची ताकद ठरली, असे राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

बाबासाहेब पुरंदरेंसारखा ‘शिव’भक्त होणे नाही

छत्रपती शिवाजी महाराज हा विचार घराघरात पोहचवणं हेच जगणं मानणाऱ्या बाबासाहेबांना हयातीतच नको तो मनस्ताप झेलावा लागला, पण त्यावर त्यांनी अवाक्षर काढलं नाही. आज बाबासाहेब आपल्यात नाहीत. ‘ह्या सम होणे नाही’, असं आपण सहजपणे म्हणतो, खरंच बाबासाहेब पुरंदरेंसारखा ‘शिव’भक्त होणे नाही, पण त्याच वेळेला असं देखील वाटतं माझ्या पिढीचं ठीक आहे पण पुढच्या पिढ्याना अस्सल आणि उत्तुंग व्यक्तिमत्व  कशी बघायला मिळणार?असो, काळ हेच त्यावरचं उत्तर आहे. बाबासाहेब पुरंदरेंच्या स्मृतिदिनी, त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन, या शब्दांत राज ठाकरे यांनी आदरांजली वाहिली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेBabasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरे