शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

“MPSC म्हणजे महाराष्ट्र पब्लिक शॉकिंग कमिशन!”; डेटा लीकवरुन अमित ठाकरेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 13:11 IST

MPSC Data Leak: MPSCच्या लाखो विद्यार्थ्यांचा डेटा सोशल मीडियावर लिक झाल्याचे सांगितले जात आहे.

MPSC Data Leak: अवघ्या काही दिवसांवर येऊन MPSC ची पूर्व परीक्षा ठेपली आहे. मात्र, यातच ही परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचा डेटा लिक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आणि विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम चॅनलवर माहिती लिक झाल्याचा दावा करण्यात आला. या चॅनलवरील एका ग्रुपमध्ये लाखो विद्यार्थ्यांची संवेदनशील माहिती लिक झाल्याचे सांगितले जात आहे. यातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र आणि विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी या प्रकारावरून MPSC वर टीका केली असून, चौकशीची मागणी केली आहे. 

टेलिग्राम चॅनलवर सुमारे १ लाख विद्यार्थ्यांचे हॉल तिकिटाचा डेटा लिक झाला आहे. हा फक्त नमुना डेटा आहे. तसेच आमच्याकडे सर्व MPSC विद्यार्थ्यांची अनेक प्रकारची माहिती उपलब्ध आहे, असा दावा टेलिग्राम चॅनलवर तयार करण्यात आलेल्या ग्रुपवर करण्यात आला आहे. या माहितीमध्ये विद्यार्थ्यांचे ऑनलाइन पोर्टल लॉगिन, फी पावती, अपलोड केलेली कागदपत्रे, आधार कार्ड क्रमांक, दूरध्वनी क्रमांक, ईमेल आयडी ... आणि बरेच काही आहे. याशिवाय, पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका २०२३ देखील उपलब्ध आहे, असा मोठा दावा या चॅनलवर करण्यात आला आहे. यानंतर एकच खळबळ उडाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तातडीने दखल घेत, या सगळ्यावर खुलासाही जारी केला. मात्र, यावरून आता अमित ठाकरे यांनी टीका केली आहे. 

'महाराष्ट्र पब्लिक शॉकिंग कमिशन' हीच ओळख सर्वांच्या मनात कायम होईल

अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबत भाष्य केले आहे. गेल्या काही वर्षांत एमपीएससीचा पेपर फुटला, परीक्षा केंद्रांवर गोंधळ, निकाल दिरंगाई अशा बातम्यांची महाराष्ट्राला सवय झाली; पण MPSC Data Leak प्रकरण धक्कादायक आहे. अवघ्या सात दिवसांवर आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रं, आयोगाकडे असलेली विद्यार्थ्यांची सर्व माहिती तसंच प्रश्नपत्रिका आपल्याकडे असल्याचा दावा कुणी समाजमाध्यमांवर करत असेल तर हे खूपच गंभीर प्रकरण आहे. उच्चस्तरीय समिती नेमून या प्रकरणाची तत्काळ चौकशी व्हायला हवी. तसंच, आयोगाने नवीन प्रश्नपत्रिका काढून ही परीक्षा घ्यायला हवी. 'डेटा खूप मौल्यवान आहे' हे ओळखून यापुढे एमपीएससीची वेबसाईट हॅकर्सकडून हॅक होणार नाही किंवा डेटा लीक होणार नाही, यासाठी आयोगाने एथिकल हॅकर्स आणि आयटी-डेटा एक्सपर्ट्सच्या सहकार्याने सर्वतोपरी तांत्रिक दक्षता घ्यायला हवी आणि आपली विश्वासार्हता जपायला हवी. अन्यथा, विद्यार्थ्यांना वारंवार धक्के देणाऱ्या गलथान कारभारामुळे या आयोगाची 'महाराष्ट्र पब्लिक शॉकिंग कमिशन' हीच ओळख सर्वांच्या मनात कायम होईल, या शब्दांत अमित ठाकरे यांनी हल्लाबोल केला आहे. 

दरम्यान, ३० एप्रिल २०२३ रोजी MPSCची पूर्व परीक्षा होणार आहे. मात्र, या व्हायरल झालेल्या माहितीनंतर विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाल्याचे सांगितले जात आहे. अशा पद्धतीने माहिती लिक होणे हा प्रशासनाचा ढिसाळ कारभार आहे. संबंधितांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाAmit Thackerayअमित ठाकरे