शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पॅथॉलॉजिस्टसाठी एमएमसी आखणार नियमावली

By admin | Updated: August 9, 2015 02:44 IST

निदानाचा काळा बाजार करून रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या पॅथॉलॉजिस्ट आणि अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबवर महाराष्ट्र वैद्यकीय परिषद कारवाईचा बडगा उचलणार आहे. पॅथॉलॉजिस्टसाठी

मुंबई : निदानाचा काळा बाजार करून रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या पॅथॉलॉजिस्ट आणि अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबवर महाराष्ट्र वैद्यकीय परिषद कारवाईचा बडगा उचलणार आहे. पॅथॉलॉजिस्टसाठी परिषद धोरणात्मक निर्णय घेणार असून, नियमावली आखणार असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष डॉ. किशोर टावरी यांनी दिली.गल्लीबोळात छोट्या गाळ्यातही पॅथॉलॉजी लॅब थाटून रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबचे स्टिंग आॅपरेशन ‘लोकमत’ने केले होते. यावेळी मुंबईसारख्या शहरातही अशा लॅब सुरू असल्याचे स्पष्ट झाले. त्याचप्रमाणे एकाच पॅथॉलॉजिस्टच्या नावाने अनेक लॅबमधून रिपोर्ट निघत असल्याचेही उघड झाले होते. काही पॅथॉलॉजिस्ट कोऱ्या रिपोर्टवर सही करून त्या बदल्यात अनधिकृत लॅबवाल्यांकडून पैसे घेतात, असे प्रकार घडत आहेत. या विषयाची परिषदेने आता गंभीर दखल घेतली आहे. रुग्णांना केंद्रस्थानी ठेऊन परिषद या प्रकारांना आळा घालण्यासाठी कारवाई करणार आहे. योग्य ती तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे डॉ. टावरी यांनी सांगितले. परिषदेकडे महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अ‍ॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्ट या संघटनेने बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या ५ पॅथॉलॉजिस्टच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. एक डॉक्टर हा महापालिकेच्या सायन रुग्णालयात रक्तपेढीत काम करीत असूनही इतर पॅथॉलॉजी लॅबच्या रिपोर्टवर सह्या करीत असल्याचे आढळून आले आहे. प्रत्यक्षात नियमांप्रमाणे त्यांना पॅ्रक्टिस करण्याची परवानगी नाही. या प्रकरणांची दखल घेत परिषद आता यासंदर्भात एका समितीची स्थापना करणार आहे. या समितीत परिषदेचे सदस्य, असोसिएशनचे सदस्य आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य असणार आहेत. कायद्यात एका पॅथॉलॉजिस्टनी किती ठिकाणी प्रॅक्टिस करावी हे नमूद केलेले नाही, तरीही शारीरिकदृष्ट्या आणि तात्त्विकदृष्ट्या विचार करता एकच पॅथॉलॉजिस्ट एका दिवसांत १८ ते २० ठिकाणी जाऊ शकत नाही. यामुळे होणारे काम हे अनधिकृत आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी परिषद योग्य ती कारवाई करेल, असे परिषदेचे कार्यकारी सदस्य डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी सांगितले.मुख्य कार्यालयात झाली सुनावणीशनिवारी परिषदेच्या चिंचपोकळी येथील मुख्य कार्यालयात सुनावणी झाली. एक पॅथॉलॉजिस्ट २८ पॅथॉलॉजी लॅबमध्ये सही करून रिपोर्ट देत असल्याचे उघड झाले. ज्या इतर पॅथॉलॉजिस्टच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे, त्यांच्याविरूद्ध असोसिएशनने पुरावे सादर केले आहेत.