शहरं
Join us  
Trending Stories
1
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
2
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
3
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
4
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
5
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
6
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
7
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
8
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
9
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
10
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
11
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
12
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
13
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
14
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
15
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
16
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
17
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
18
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
19
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
20
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा

शिंदे गटाचा आमदारपुत्र फरार; गोरेगावमधील व्यावसायिकाचे अपहरण प्रकरण, साथीदारांना पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 8:17 AM

वनराई पोलिसांनी गुरुवारी राज याचे तीन साथीदार मनोज मिश्रा, पुनित सिंग आणि चंदन सिंग या तिघांना अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कथितपणे सुपारी घेऊन गोरेगावमधील म्युझिक कंपनीचे सीईओ राजकुमार सिंग यांना बंदुकीच्या धाकात धमकावत, त्यांचे अपहरण करणाऱ्या मागाठाणेतील शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज याच्या तीन साथीदारांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. राज मात्र अद्याप फरार असून, गुन्ह्यात सहभागी असलेल्या त्याच्या अन्य साथीदारांचाही शोध सुरू आहे. 

वनराई पोलिसांनी गुरुवारी राज याचे तीन साथीदार मनोज मिश्रा, पुनित सिंग आणि चंदन सिंग या तिघांना अटक केली. या तिघांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले, तेव्हा त्यांना १४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले. त्यात राजसह त्याचे १० ते १५ साथीदार दिसत आहेत. सिंग यांच्या तक्रारीनंतर वनराई पोलिसांनी या प्रकरणी ९ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करत, विमानतळावरून पळण्याचा प्रयत्न करण्यापूर्वीच तिघांचा गाशा गुंडाळला. या प्रकरणी अजून कोणालाही अटक करण्यात आली नसून, आम्ही आरोपींचा शोध घेत असल्याचे वनराई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामपियारे राजभर यांनी सांगितले.

सिंग यांची गोरेगाव येथे ‘ग्लोबल म्युझिक जंक्शन’ नावाची कंपनी आहे. या माध्यमातून ते कर्ज देण्याचे काम करतात. कंपनीने मिश्राच्या ‘अदिशक्ती’ नामक म्युझिक कंपनीला २०२१ मध्ये  ८ कोटी रुपयांचे कर्ज दिले व यासाठी ५ वर्षांचे करारपत्र, तसेच ३ वर्षांचा लॉकिंग पीरियड ठेवला. करारानुसार सिंगना ५ वर्षांत ११ कोटी मिळणार होते. मात्र, मिश्राने ती रक्कम चॅनेल कंटेट बनविण्यासाठी न वापरता इतरत्र लावली आणि कंपनीला मिळणारा नफा कमी झाला, तसेच त्याने करार रद्द करण्यासाठीही दबाव टाकला. मिश्रा अधिक पैशांची मागणी करू लागला आणि ९ ऑगस्ट रोजी सिंग यांना प्रकाश सुर्वे यांच्या ऑफिसमध्ये फोन करून धमकावण्यात आले.

टॅग्स :Prakash surveप्रकाश सुर्वेEknath Shindeएकनाथ शिंदे