शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे गटाचे आ. संजय गायकवाड यांनी भर मिरवणुकीत युवकाला बेदम झोडपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 06:18 IST

व्हिडीओ व्हायरल : कार्यकर्त्याने अडवले म्हणून बचावला तरुण; वाघाची शिकार केल्याप्रकरणी झाला होता वन खात्यात गुन्हा 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलढाणा : शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी १९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या मिरवणुकीत पोलिसांच्या काठीने एका युवकास बेदम झोडपल्याचा व्हिडीओ शुक्रवारी समाजमाध्यमावर व्हायरल झाला. त्यामुळे आमदाराच्या दादागिरीबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.

आमदार गायकवाड हे काही दिवसांपासून वादात आहेत. याच आठवड्यात शिकार केलेल्या वाघाचा दात गळ्यात घालण्यासाेबतच एका महिलेची शेती हडप केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. असे असतानाच आता एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पुन्हा त्यांच्या दादागिरीचा प्रकार समोर आला आहे. 

पोलिसाची काठी घेऊन दादागिरीसंबंधित व्हिडीओ हा १९ फेब्रुवारीच्या शिवजयंती मिरवणुकीचा आहे. यामध्ये एका युवकास पोलिसांनी धरलेले असताना आमदार गायकवाड हे पोलिसाच्या हातातील काठी हिसकावून स्वत:च त्या युवकास बेदम मारहाण करीत आहेत. पोलिस त्यांचे कर्तव्य निभावत असताना लोकप्रतिनिधीने कायदा हातात घेऊन अशा प्रकारची दादागिरी केल्याबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पोलिसांत तक्रार नाही१९ फेब्रुवारीच्या या प्रकाराबद्दल पोलिसांमध्ये कुठलीही तक्रार दाखल झालेली नाही. मात्र या व्हायरल व्हिडीओनंतर कारवाई हाेणार का? असा प्रश्न विराेधी पक्षाने विचारला आहे.

तक्रार आल्यास कारवाई पोलिसांकडे अद्याप कुठलीही तक्रार आलेली नाही. मात्र तक्रार आल्यास संपूर्ण शहानिशा व कायदेशीर बाबींची तपासणी करून निश्चितच गुन्हा दाखल करण्यात येईल.- सुनील कडासने, पोलिस अधीक्षक, बुलढाणा

आमदार गायकवाड सातत्याने वादातnशिवजयंतीच्या कार्यक्रमातच आ. गायकवाड यांनी ३७ वर्षांपूूर्वी वाघाची शिकार केली असून त्याचा दात गळ्यातील माळेमध्ये घातल्याचे वक्तव्य केले होते. स्थानिक माध्यमांशी वेशभूषेसंदर्भात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले होते. nया प्रकरणात वनविभागाच्या एका पथकाने त्यांचा जबाबही नोंदविला होता. सोबतच तो कथित दातही ताब्यात घेतला होता. सोमवारी हा दात डेहराडून येथील वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूटकडे डीएनए तपासणीसाठी पाठविल्याचे वन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.nहे प्रकरण शांत होते न होते तोच नागपूर येथील रिता उपाध्याय या महिलेची जमीन आ. गायकवाड यांनी हडप केल्याचे प्रकरण समोर आले होते. यामध्ये बोराखेडी पोलिसांनी २८ फेब्रुवारीला मोताळा न्यायालयाच्या आदेशानुसार आ. गायकवाड यांच्यासह पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

किती बाेलायचं? : वडेट्टीवार nविधानसभेचे विराेधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आ.गायकवाड हे मारहाण करीत असल्याच्या व्हायरल व्हिडीओबाबत उद्वेग व्यक्त करणारी पाेस्ट एक्सवर केली आहे. nते म्हणतात, किती बोलायचं?, किती प्रकरणं रोज दाखवायची? या व्हिडीओत तरुणाला अमानुष मारहाण करणारी व्यक्ती ही काही मामुली गुंड नाही. मारहाण करणारी व्यक्ती मुख्यमंत्र्यांच्या गटाची आमदार आहे. nहवेत गोळीबार, एकमेकांवर गोळीबार, एकमेकांना लाथाबुक्क्या मारून सुरू असलेलं महायुतीचं विकासाचं राजकारण आता जनतेला लाठ्या काठ्यांनी झोडपून काढण्यापर्यंत पोहाेचलं आहे.

मारहाणीच्या घटनेचा व्हिडीओ मी बघितलेला नाही. बघितल्यानंतर पुढे काय कार्यवाही करायची ते ठरवू.     - भरत गाेगावले,     प्रवक्ता, शिंदे गट

टॅग्स :Sanjay Gaikwadसंजय गायकवाडShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे