शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

अपघातामध्ये रेल्वेचीच चूक - मोनिका मोरे

By admin | Updated: July 19, 2014 23:55 IST

घाटकोपर स्थानकामध्ये माझा जो अपघात झाला यामध्ये रेल्वे प्रशासनाची चूक आहे. फलाटांची उंची वाढवण्याच्या बरोबरीनेच फलाट वाढवण्याची आवश्यकता आहे.

तुझा इतका मोठा अपघात झाला यात चूक कोणाची?
- घाटकोपर स्थानकामध्ये माझा जो अपघात झाला यामध्ये रेल्वे प्रशासनाची चूक आहे. फलाटांची उंची वाढवण्याच्या बरोबरीनेच फलाट वाढवण्याची आवश्यकता आहे. मुंबईत रेल्वेमधून लाखो प्रवासी रोज प्रवास करत असतात. या प्रवाशांना रेल्वेने पायाभूत सुविधा देण्याची गरज आहे. अनेकांचे रेल्वेमध्ये अपघात होत असतात. मात्र प्रत्येकालाच माङयाप्रमाणो नवीन जीवन मिळते असे नाही.
या अपघातामधून काय शिकलीस..
- कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण धीर सोडायचा नाही. कितीही मोठे संकट आले तरी आपण खचून जायचे नाही, या गोष्टी मी अपघातातून शिकले आहे. या अपघातामुळे माङो आई - बाबा खूप घाबरून गेले होते. मात्र ते माङया मागे धीराने उभे राहिले. म्हणूनच मी आज सगळ्य़ांमध्ये वावरते आहे. 
घरी गेल्यावर पहिल्यांदा तू काय करणार?
मी गेले सहा महिने केईएममध्येच आहे. हे माङो घरच झाले आहे. 
इथले डॉक्टर मला म्हणत होते, आम्ही तुला डिस्चार्ज देणार नाही, तू 
इथेच रहायचे. मी पण केईएमला नक्कीच मिस करेन. पण आता सहा महिन्यांनी मी घरी जाणार याचा मला खूप आनंद आहे. घरी गेल्यावर मी पहिल्यांदा टीव्ही पाहणार आहे. भावाबरोबर मला मस्ती करायची आहे आणि हो, अजून एक गोष्ट म्हणजे मी परत कॉलेजला जायला लागणार आहे. आधीच माङो कॉलेज खूप बुडले आहे.
तू भविष्यात काय करायचे ठरवले आहेस?
मला माङया कॉलेजने परवानगी दिली असल्यामुळे मी आता बारावीच्या वर्गात गेले आहे. मी यंदा बारावीची परीक्षा देणार आहे. यानंतर माझा पदवीचा अभ्यास मी पूर्ण झाल्यानंतर मला नोकरी करायची आहे. मला स्वत:च्या पायावर उभे राहायचे आहे. यासाठी लागणारी सगळी मेहनत मी करायला तयार आहे. 
या सगळ्य़ातून बाहेर पडण्यासाठी मानसिक बळ कसे मिळाले?
या अपघातानंतर अनेक व्यक्तींनी मला धीर दिला आहे. माङो आई - बाबा, कुटुंबिय, मित्र मैत्रिण हे सर्व माङया बरोबर नेहमीच होते. याचबरोबरीने केईएम रुग्णालयातील डॉक्टर, इतर कर्मचा:यांनी देखील मला मानसिक बळ दिले.  माझा असा अपघात झाला. त्यात मला दोन्ही हात गमवावे लागले, असे कळल्यावर अनेक रुग्ण, अपंग व्यक्ती मला भेटायला आल्या. एक मुलगा मला कोल्हापूरहून भेटायला आला होता. या सगळ्य़ांनी मला आधार दिला. कृत्रिम हात मिळाल्यावर आम्हाला सगळ्य़ांनाच आनंद झाला. यामुळेच माझा आत्मविश्वास अजून वाढला. मित्र - मैत्रिणी माङयाबरोबर बसायलाय यायचे, माङयाशी गप्पा मारायचे यामुळे माझा वेळ आनंदात जायचा.
अपघातग्रस्तांसाठी काही करायचे ठरवले आहेस का?
अपघातामध्ये अनेकांना आपले हात-पाय गमवावे लागतात. मात्र त्यातील प्रत्येकालाच कृत्रिम अवयव मिळतात असे नाही. मात्र अशा व्यक्तींशी यापुढे मी संवाद साधणार आहे. त्यांना माझा अनुभव सांगणार आहे. तुम्ही सकारात्मक दृष्टी ठेवा असे मला सगळ्य़ांनाच सांगायचे आहे. अपघाताने खचून जाऊ नका, नव्याने सुरूवात करा, असे मला सगळ्य़ांना सांगायचे आहे. यासाठी काय करणार हे नक्की ठरवलेले नाही. मात्र जिथे संधी मिळेल तिथे जाऊन मी हे नक्कीच करेन. 
तुङो छंद काय आहेत?
मला डान्स करायला आवडतो. मला फिरायला आवडते. लहानपणापासून मी माङो हे छंद जोपासले आहेत. पुढेही हे छंद मी नक्कीच जोपासणार आहे.
 
घाटकोपर स्थानकावर 11 जानेवारी रोजी 17 वर्षीय मोनिका मोरे हिचा अपघात झाला. या अपघातामध्ये माोनिकाला दोन्ही हात गमवावे लागले. मोनिकावर इतके मोठे संकट कोसळले तरी ती डगमगली नाही, निर्धाराने उभी राहिली. गेले सहा महिने तिच्यावर परेल येथील केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. तिला खास जर्मन बनावटीचे कृत्रिम हात बसवण्यात आले आहेत. तिच्या कृत्रिम हाताची हालचाल तिला व्यवस्थित करता येऊ लागली आहे. तब्बल सहा महिन्यांनी 18 जुलैला रात्री मोनिका हिला डिस्चार्ज देण्यात आला. मोनिकाचा हा प्रवास तिच्याच शद्बात.. 
(मुलाखत - पूजा दामले)