शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

परिवहनमंत्र्यांकडून कर्मचा-यांची दिशाभूल; इंटकचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 04:37 IST

एसटी कर्मचारी करत असलेल्या श्रम आणि त्या बदल्यात मिळणारा मोबदला हा कमी आहे. हे एसटी प्रशासनाने मान्य केले आहे. संपाला स्थगिती देत, संप बेकायदेशीर ठरविण्यात यावा

मुंबई : एसटी कर्मचारी करत असलेल्या श्रम आणि त्या बदल्यात मिळणारा मोबदला हा कमी आहे. हे एसटी प्रशासनाने मान्य केले आहे. संपाला स्थगिती देत, संप बेकायदेशीर ठरविण्यात यावा, असे म्हणणे राज्याचे औद्योगिक न्यायालयाने फेटाळले आहे. या संपाला अंतरिम स्थगिती देण्यात आलेली नाही, अथवा बेकायदेशीरदेखील ठरविण्यात आलेली नाही. या प्रकरणी २३ आॅक्टोबर रोजी सुनावणी व्हायची आहे. यामुळे आत्ताच एसटी प्रशासन संप बेकायदेशीर असल्याचे सांगत, कर्मचाºयांवर कारवाई करू, असे म्हणणे अयोग्य असल्याचे इंटक कर्मचारी संघटनेने म्हटले आहे.एसटी कर्मचाºयांचा वेतन आयोगाच्या मागणीसाठी राज्यभर संप सुरू आहे. यामुळे दिवाळीनिमित्त प्रवास करणाºयांचे हाल होणार आहेत. एसटी प्रशासन आणि कर्मचारी यांच्या वादामुळे खासगी वाहतूकदारांकडून थेट आगारांमध्ये बससेवा सुरू केली आहे. हे प्रकार होत असताना परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्षांकडून संप बेकायदेशीर असल्याचे म्हणणे चुकीचे असल्याचे इंटकतर्फे सांगण्यात आले.लातूर येथील कामगार न्यायालय महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस संघटना आणि महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना यांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी कामगार न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात औद्योगिक न्यायालय लातूर (प्रभारी पुणे) येथे रिव्हिजन अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणी १५ आॅक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीत औद्योगिक न्यायालयाने, कामगार न्यायालयातील संपूर्ण कामकाजातील कागदपत्रे व मूळ संचिका मागविली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २३ आॅक्टोबर रोजी आहे. प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. यामुळे कामगार न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचा कोणताही परिणाम संपावर होत नाही, अशी माहिती इंटकचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी दिली.खासगी बस चालकांकडून लूटसंप काळात शासनाकडून खासगी वाहकांना प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आली. सोमवारी सुमारे २००० खासगी बस आणि २००० अन्य वाहने सोडण्यात आली. खासगी बस चालकांनी प्रवाशांची लूट केली. महामंडळातील वरिष्ठ अधिकाºयांनी नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली.एसटी संपाविरुद्ध हायकोर्टात जनहित याचिकामुंबई : सोमवार मध्यरात्रीपासून महाराष्ट्र एसटी संघटना (मान्यताप्राप्त), महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस संघटनेने (इंटक) सातव्या वेतन आयोगासाठी बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे ऐन दिवाळीत लाखो प्रवाशांचे हाल होतील. त्यामुळे हा संप बेकायदा व कायद्याच्या दृष्टीने अयोग्य असल्याचे जाहीर करण्यासाठी, एक जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.याचिकेनुसार, दररोज ६५ लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात. ग्रामीण भागात नित्याच्या कामासाठी एसटीनेच प्रवास केला जातो. सध्या एसटीचे ९८ टक्के कर्मचारी संपावर आहेत. एसटी ही अत्यावश्यक सुविधांच्या श्रेणीत मोडत असल्याने, एसटी कर्मचारी संपावर जाऊ शकत नाहीत. लोकांना वेठीस धरून मागण्या मान्य करून घेऊ शकत नाहीत. त्यामुळे हा संप बेकायदेशीर ठरवावा व याचिका प्रलंबित असेपर्यंत संपाला स्थगिती द्यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली. बुधवारी आज नरक चतुर्दशी असल्यामुळे सुट्टीकालीन न्यायालयाला सुट्टी आहे. मात्र, या याचिकेच्या सुनावणीसाठी न्यायालय सुरू राहणार आहे.

टॅग्स :ST Strikeएसटी संप