शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
3
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
4
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
5
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
6
Hero Motors चा IPO येतोय! कंपनीचा बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क! काय आहे भविष्यातील प्लॅन?
7
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
8
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
9
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
10
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
11
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
12
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
13
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
14
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
15
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
16
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
17
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  
18
Accident Video: भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद
19
Mumbai: धक्कादायक! पतीला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून पत्नीवर बलात्कार; पैसे, दागिनेही लुबाडले
20
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट

मनसेला खिंडार !

By admin | Updated: January 14, 2015 04:14 IST

मनसे नेतृत्वावर नाराज असलेले दरेकर, गीते भाजपात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येतच होत्या.

मुंबई : मुंबै बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, वसंत गीते आणि रमेश पाटील या तीन माजी आमदारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला, तर माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करीत मंगळवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. मनसे सोडण्याच्या कारणाबाबत कुठलेही भाष्य करू नका, असा दानवे यांचा आदेश असल्याने दरेकर व अन्य नेत्यांनी त्याबाबत मौन बाळगले.मनसे नेतृत्वावर नाराज असलेले दरेकर, गीते भाजपात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येतच होत्या. त्यावर आज शिक्कामोर्तब झाले. त्यांच्याबरोबर १२ जिल्हाध्यक्ष, चार जिल्हा परिषद सदस्य, दोन पंचायत समिती सभापती व तीन सदस्यांनीदेखील भाजपात प्रवेश केल्याचे जाहीर करण्यात आले. भाजपाला एक कोटी सदस्य नोंदवायचे आहेत. त्यामुळे अन्य पक्षातून जर मंडळी येत असतील तर त्यांना सदस्य करून त्यांचे पक्षात स्वागत केले जाईल, असे दानवे म्हणाले. दरेकर यांच्यावर मुंबै बँक घोटाळ््याबाबत आरोप असताना त्यांना प्रवेश कसा दिला, असा सवाल केला असता दानवे म्हणाले की, आरोप असणे म्हणजे दोषी असणे नाही. भाजपात प्रवेश केलेल्या एखाद्या व्यक्तीवरील आरोप सिद्ध झाले तर तत्काळ त्याला पक्षातून काढून टाकण्यात येईल, असेही रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)