‘अल्पसंख्याक’ फलकाची शाळा, कॉलेजांना सक्ती
By Admin | Published: June 29, 2016 05:19 AM2016-06-29T05:19:17+5:302016-06-29T05:19:17+5:30
राज्यातील अल्पसंख्याक शाळा आणि कॉलेजांना शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून ‘अल्पसंख्याक’ असा फलक लावण्याची सक्ती राज्य सरकारने केली आहे.
मुंबई : राज्यातील अल्पसंख्याक शाळा आणि कॉलेजांना शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून ‘अल्पसंख्याक’ असा फलक लावण्याची सक्ती राज्य सरकारने केली आहे. मराठी आणि इंग्रजी भाषेत हे फलक लावावे लावण्याच्या सूचना सर्व अल्पसंख्याक शिक्षण संस्थांना देण्यात आल्या असून शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ हे फलक लावणे अनिवार्य असणार आहे.
राज्यातील अनेक शाळा, कॉलेज शिक्षणहक्क कायद्यातील नियमांचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे ही सक्ती करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आरटीई शिक्षणाच्या बचावासाठी मुंबईसह अनेक शाळांनी अल्पसंख्याक असल्याचे सांगितले होते. तर अनेक शाळांचा आरटीई प्रवेश आणि अल्पसंख्याक दर्जा असा वाद सुरु अजूनही सुरु आहे.
याला चाप बसवण्यासाठी राज्यसरकारच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत या फलकाची सक्ती करण्यात आली आहे. या नुसार संस्थेला कोणत्या आधारावर अल्पसंख्याक दर्जा दिला आहे. हे नमूद करणे गरजेचे राहणार आहे. (प्रतिनिधी)