शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
3
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
4
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
5
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
6
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
7
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
8
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
9
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
10
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
11
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
12
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
13
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
14
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
15
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
16
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
17
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
18
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
19
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा

अल्पवयीन मुलीवर मानखुर्दमध्ये बलात्कार

By admin | Updated: May 11, 2014 00:23 IST

मानखुर्द रेल्वे स्थानक परिसरात लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याची घटना घडली आहे.

नवी मुंबई : मानखुर्द रेल्वे स्थानक परिसरात लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याची घटना घडली आहे. एका स्वयंसेवी संस्थेने हा प्रकार उघडकीस आणला असून या प्रकरणी वाशी रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. 
मानखुर्द रेल्वे स्टेशनच्या वापरात नसलेल्या तीन नंबर प्लॅटफॉर्मवर बेघर नागरिक वास्तव्य करतात. येथील मुलांचे प्रश्न सोडविण्यासाठी एका सामाजिक संस्थेने काम सुरू केले आहे. या मुलांची वैद्यकीय चाचणी केली असता  १६ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग झाल्याचा प्रकार निदर्शनास आला. याविषयी माहिती घेतली असता अबू पंडाराम नावाच्या तरुणाने या मुलीला लग्न करण्याचे आमिष दाखविले होते. तिच्यावर जानेवारी ते एप्रिल २0१४ दरम्यान अतिप्रसंग केल्याचे निदर्शनास आले . याविषयी तत्काळ मानखुर्द रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेथून तो वाशी 
रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये वर्ग 
करण्यात आला आहे. आज रात्री वाशी रेल्वे पोलिसांनी हा गुन्हा वर्ग करून पुढील तपास सुरू केला असल्याची माहिती रेल्वे पोलिस नियंत्रण कक्षाने दिली. रात्री उशिरापर्यंत आरोपीस अटक करण्यात आली नव्हती. याविषयी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राजश्री गोरे करीत आहेत. 
ठाणे अंमलदाराची लपवाछपवी
अल्पवयीन मुलीवरील अतिप्रसंगाच्या गुन्ह्याची माहिती वाशी रेल्वे पोलिस स्टेशनमधील ठाणे अंमलदार सहायक पोलिस निरीक्षक अलिप रामा पटारा यांनी लपविण्याचा प्रयत्न केला. याविषयी माहिती विचारली असता, आमच्याकडे गुन्हा दाखल नाही. तपास सुरू आहे. अधिकारी घटनास्थळी गेले आहेत, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. गुन्हा दाखल झाल्याची माहितीही सांगण्यात येत नव्हती.