शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुले वळताहेत गुन्हेगारीकडे

By admin | Updated: May 20, 2016 02:33 IST

शहरात गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत असून, घडणाऱ्या गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचे प्रमाण काळजी करण्याइतपत आहे.

तळवडे : शहरात गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत असून, घडणाऱ्या गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचे प्रमाण काळजी करण्याइतपत आहे. विशेषत: चोरी, लूटमारी, टोळीयुद्ध यांसारख्या गुन्ह्यांत अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत असल्याने पालकांच्या जिवाला घोर लागला आहे.मंगळवारी सकाळच्या सातच्या सुमारास चिखली येथील वृंदावन सोसायटीतील मथुरा स्वीटसमोर वृत्तपत्रविक्रेते शिवानंद चौगुले हे सकाळच्या वेळेत दूध आणि पेपरची लाइन टाकतात. चौगुले यांना दुधाची पिशवी किती रुपयांना आहे, असे एका अल्पवयीन मुलाने विचारले. त्यांच्या हातात दहा रुपयांची नोट देत असतानाच हाताला झटका देत त्यांच्या हातातील जवळपास एक हजार रुपयांची रोकड हिसकावली. काही कळायच्या आतच तो मुलगा रस्त्याच्या पलीकडे अगोदरच दोन मित्रांसह उभ्या असलेल्या दुचाकीवर बसून पसार झाला. याबाबत त्यांनी चिखली येथील सानेवस्ती पोलीस चौकीत तक्रार नोंदविली आहे. पळवलेली रक्कम किरकोळ आहे. सकाळच्या वेळेत घरोघर दूध पिशव्या पोहोच करणाऱ्या व्यावसायिकांच्या दूधपिशव्या गायब होत आहेत. कधी कधी दुधाचा संपूर्ण ट्रे गायब केला जातो. आता तर हातातील रक्कम हिसकावून पळण्यापर्यंत मजल गेली आहे. अशा प्रकारच्या आणखी बऱ्याच चोरीच्या घटना घडत आहेत. किरकोळ रक्कम असल्यामुळे कोणी सहसा तक्रार करत नाहीत. त्यामुळे या गुन्ह्यांना वाचा फुटत नसल्याने चोरट्यांचा या परिसरात सुळसुळाट झाला आहे. या प्रकारामुळे दूधपिशव्या पोहोच करणारे, तसेच इतर व्यावसायिक वैतागले आहेत. पोलिसांनी या प्रकाराला आळा घालावा, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.(वार्ताहर)>इझी मनी : मौजमजा करण्यासाठी चोऱ्या ‘इझी मनी’ मिळवायचा आणि त्या पैशाचा हवा तसा विनियोग करायचा, अशी मानसिकता मुलांमध्ये वाढत आहे. मौजमजा करण्यासाठी घरून पैसे मिळू शकत नाहीत. यात घरची आर्थिक परिस्थिती उत्तम असणाऱ्या मुलांकडूनही वाममार्गाचा वापर केला जात आहे. एकमेकांच्या साथीने गुन्हेगारी क्षेत्राकडे वळणाऱ्या अल्पवयीन मुलांची संख्या वाढत असल्याने पालकांच्या जिवाला मात्र घोर लागला आहे.