शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यातील भाग्यनगरच्या भाग्यात आजही मंत्रीपद

By रवींद्र देशमुख | Updated: January 4, 2020 17:13 IST

युतीच्या काळात अर्जुन खोतकर यांना मंत्रीपद मिळाले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात त्यांच्याकडे राज्यमंत्रीपदाची जबाबदारी होती. खोतकर यांच्या रुपाने जालन्यालाच नव्हे तर भाग्यनगरला मंत्रीपद मिळाले होते.

- रवींद्र देशमुख

मुंबई - महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त लागला आहे. मंत्र्यांचा शपथविधी देखील उरकला असून जालना जिल्ह्याला राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांच्या रुपाने मंत्रीपद मिळाले आहे. टोपे यांची मंत्रीपदी वर्णी लागल्याने जालना शहरातील भाग्यनगरमधील मंत्रीपदाची परंपरा कायम राहिली आहे. 

राजेश टोपे यांचे जालना शहरातील भाग्यनगरमध्ये निवासस्थान आहे. राज्यात युती सरकार येण्यापूर्वीच्या आघाडी सरकारमध्ये राजेश टोपे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री होते. 2001 पासून ते मंत्रीपदी आहेत. 2014 मध्ये राष्ट्रवादीला विरोधात बसावे लागले. त्यानंतर शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांची मंत्रीपदी वर्णी लागली होती. खोतकर यांचे निवासस्थान देखील भाग्यनगरमध्येच आहे. मंत्री टोपे यांच्या बंगल्यापासून थोड्याच अंतरावर खोतकर यांचे निवासस्थान आहे. 

युतीच्या काळात अर्जुन खोतकर यांना मंत्रीपद मिळाले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात त्यांच्याकडे राज्यमंत्रीपदाची जबाबदारी होती. खोतकर यांच्या रुपाने जालन्यालाच नव्हे तर भाग्यनगरला मंत्रीपद मिळाले होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत खोतकर यांचा पराभव झाला असला तरी शिवसेना पक्ष सत्तेत आला आहे. तर शिवसेनेसोबत राष्ट्रवादी आणि काँग्रेस देखील आहे. 

राष्ट्रवादीकडून राजेश टोपे यांची पुन्हा एकदा मंत्रीपदी निवड झाली आहे. त्यामुळे भाग्यनगरला मंत्रीपद मिळण्याची परंपरा कायम राहिली आहे. टोपे यांचे यांचं खातं अद्याप निश्चित झालं नसल तरी त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे भाग्यनगरमध्ये पुन्हा एकदा वर्दळ वाढण्यास सुरूवात झाली आहे.