शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कराच्या प्रश्नावरून मंत्र्यांमध्ये विसंगती

By admin | Updated: July 15, 2015 00:33 IST

मुंबईकरांकडून महापालिकेने २०१० ते २०१५ या काळात वसूल केलेला १२०० कोटी रुपयांचा अतिरिक्त कर परत करण्याची जोरदार मागणी मुंबईतील भाजपाच्या

मुंबई : मुंबईकरांकडून महापालिकेने २०१० ते २०१५ या काळात वसूल केलेला १२०० कोटी रुपयांचा अतिरिक्त कर परत करण्याची जोरदार मागणी मुंबईतील भाजपाच्या आमदारांनी केली. याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असे उत्तर नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले खरे; परंतु मुंबईकरांकडून जास्त रक्कम घेतलीच नव्हती, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तरात केल्याने मंत्र्यांची चांगलीच फजिती झाली.भाजपाचे अतुल भातखळकर यांनी मुंबई महापालिकेने नागरिकांकडून वसूल केलेला १२०० कोटींचा अतिरिक्त कराचा प्रश्न उपस्थित केला. हा कर बिल्टअप एरियावर आकारण्यात आला, पण तो कार्पेेट एरियावर आकारायला हवा होता. उच्च न्यायालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे चालू वर्षापासून तो कार्पेट एरियावर आकारला जात असला तरी पाच वर्षांत आकारलेल्या अतिरिक्त कराचे काय, असा सवाल भातखळकर यांनी केला. तर हा अतिरिक्त कर मुंबईकरांना परत करण्याची मागणी आशिष शेलार यांनीही उचलून धरली. एकीकडे राज्यमंत्री पाटील हे अतिरिक्त कराची रक्कम मुंबईकरांना परत करण्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन देत होते, त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेले लेखी उत्तर मात्र वेगळेच होते. मंत्र्यांमधील ही विसंगती पत्रकारांच्या लक्षात आली, पण प्रश्न विचारणारे आमदार मात्र अनभिज्ञ होते. (विशेष प्रतिनिधी)जादा एफएसआय घेतलागेल्या सहा वर्षांत मुंबई महापालिकेने डीसी रुल ३३(२४) अंतर्गत वाहनतळांसाठी दिलेला एफएसआय आणि प्रत्यक्ष तयार झालेले वाहनतळ आणि महापालिकेकडे हस्तांतरित झालेली वाहनतळे याचा स्टेटस् रिपोर्ट सरकार तयार करेल, असे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी दिले. भाजपाच्या मनीषा चौधरी, आशिष शेलार यांनी प्रश्न विचारला होता. मुंबई महापालिकेने शहरात ३०, पूर्व उपनगरात १० व पश्चिम उपनगरात १९ अशा एकूण ६० बिल्डरांना जादा एफएसआय दिला. त्या मोबदल्यात ४२ हजार ६६४ वाहनांसाठी पार्किंगची सोय करून देणे अपेक्षित होते.