शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील नाट्यगृहांचे अत्याधुनिकीकरण करणार, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 07:49 IST

योजना तयार करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी एका बैठकीत दिले.

मुंबई : राज्यातील नाट्यगृहांचे आधुनिकीकरण आणि अद्ययावतीकरण करण्याची योजना तयार करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी एका बैठकीत दिले. राज्यातील नाट्यगृहांच्या समस्यांबाबत बैठक मंत्रालयात मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी नाट्य निर्माता दिलीप जाधव, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, विद्या वाघमारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव प्रशांत नवघरे उपस्थित होते.

प्रत्येक नाट्यगृहाच्या अत्याधुनिकीकरणासाठी चार ते दहा कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्याच्या निधी वाटपाचे टप्पे निश्चित करण्यात येतील. राज्यात सध्या एकूण ८३ नाट्यगृहे आहेत. यापैकी खाजगी २८, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अखत्यारित ५१ आणि राज्य शासनाची ४ नाट्यगृहे आहेत. या सर्व नाट्यगृहांचे आधुनिकीकरण पुढील १० वर्षांत करण्यात येईल.

जग थक्क होईल असे वस्तुसंग्रहालय उभारणारराज्याचे संपूर्ण सांस्कृतिक वैभव प्रदर्शित होण्याबरोबरच अवघे जग थक्क होईल, असे राज्य वस्तुसंग्रहालय महाराष्ट्रात साकारण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. हे संग्रहालय कुठे उभारणार याची घोषणा मात्र त्यांनी केली नाही.या संकल्पिक वस्तुसंग्रहालयामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाचे महत्त्वाचे कालखंड जसे की, अश्मयुगीन, प्रागैतिहासिक काळ, ऐतिहासिक व मध्ययुगीन काळ, मराठा व ब्रिटिश कालखंड तसेच महाराष्ट्रातील लोकजीवन व आदिवासी संस्कृती, स्वातंत्र्य लढा व संयुक्त महाराष्ट्र चळवळ व आधुनिक महाराष्ट्रासंबंधी विविध दालने यांचा समावेश असेल. यासाठी सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.