शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यमंत्री दिलीप कांबळे पोलिसांना सापडेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 07:06 IST

औरंगाबाद : विदेशी दारू विक्री दुकानाचे लायसन्स देण्याच्या आमिषाने औरंगाबादच्या व्यापाऱ्यास १ कोटी ९२ लाख रुपयांचा गंडा घातल्याबद्दल महिन्यापूर्वी ...

औरंगाबाद : विदेशी दारू विक्री दुकानाचे लायसन्स देण्याच्या आमिषाने औरंगाबादच्या व्यापाऱ्यास १ कोटी ९२ लाख रुपयांचा गंडा घातल्याबद्दल महिन्यापूर्वी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल झाला, पण पोलिसांनी एकाही आरोपीला अटक केली नाही. आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कोर्टाच्या आदेशानुसार, दिलीप कांबळे, दिलीप काळभोर, दयानंद वनंजे व सुनील मोदी यांच्याविरुद्ध मार्चमध्ये गुन्हा दाखल झाला. खुलताबाद तालुक्यातील विलास दादाराव चव्हाण यांचा बीअर बार, रेस्टॉरंटचा व्यवसाय आहे. दिलीप काळभोर त्यांचा नातेवाईक असून, त्याने त्यांना दारूविक्रीचा परवाना मिळवून देतो, असे सांगून १ कोटी ९२ लाख रुपये उकळले. त्यासाठी तत्कालीन उत्पादनशुल्क राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची व विलास चव्हाण यांची भेट करून दिली. मुंबईतील एका बंद दारू दुकानाचे लायसन्स हस्तांतरित करून देण्यासाठी आरोपींनी २ कोटी १५ लाख रुपयांची मागणी केली. आॅक्टोबर, २०१५ ते २० मे, २०१८ या कालावधीत चव्हाण यांनी तब्बल १ कोटी ९२ लाख रुपये आरोपींना दिल्याची तक्रार आहे....अन् शब्द पाळलाच नाहीमंत्री कांबळे यांचे खाते बदलले गेले, त्यामुळे दारू दुकानाचा परवाना हस्तांतरण करून देण्याचा शब्द त्यांनी पाळला नाही. एवढेच नव्हे, तर चव्हाण यांच्याकडून घेतलेले पैसे परत देण्यास नकार दिला. यामुळे चव्हाण यांनी याविषयी मार्च महिन्यात पोलिसांत तक्रार दिली. मात्र, तक्रारीत मंत्र्यांचे नाव असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे चव्हाण यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर संबंधितांवर सिडको पोलीस ठाण्यात मार्च महिन्यात गुन्हा नोंद झाला.

टॅग्स :Dilip Kambleदिलीप कांबळे