शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

किमान वीज वापरात करा सिंचन

By admin | Updated: January 13, 2017 02:01 IST

येणाऱ्या काळात शेतकऱ्यांनाच किमान वीज वापरात सिंचन करावे लागणार आहे. या भागात त्याचीच माहिती घेऊया...

सध्या शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात व अखंडित वीजपुरवठा होणे ही मोठी कसरत आहे. बऱ्याच ठिकाणी पाणी असूनही केवळ विजेअभावी पिके जळाल्याची उदाहरणे आहेत. महावितरणने कितीही ठरवले तरी पूर्ण दाबाने वीजपुरवठा होणे अशक्य आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांनाच किमान वीज वापरात सिंचन करावे लागणार आहे. या भागात त्याचीच माहिती घेऊया...किमान वीज वापरून सिंचन करण्यासाठी शेतकऱ्यांना काही बदल करावे लागतील. पाईपलाईन रचना : आपले किती क्षेत्र सिंचनाखाली आहे. वीज किती तास मिळणार, पाण्याची उपलब्धता किती, त्यावर कोणत्या सीझनमध्ये आपण काय पिके घेणार या सर्वांचा विचार करुन पाईपलाईनची रूंदी ठरवावी तसेच ती किती लांब व उंच न्यायची त्याचा विचार करून योग्य तेथे हवा काढण्यास व्हॉल्व्ह, नॉन रिटर्न व्हॉल्व्ह बसवावेत. पाईपलाईन टाकताना ती शक्यतो सरळ असावी. त्यामुळे लांबी कमी होऊन खर्च तर वाचतोच पण सरळ गेल्याने कमी विजेत पाणी जास्त दाबाने जाते. पाईपलाईनवर डावे- उजवे फाटे काढायचे असतील तर ते काटकोनात न काढता वक्राकार बेंड वापरावेत.वीजपंपाची निवड : तज्ज्ञांचा सल्ला घेवून शक्यतो पाण्यातील पंप निवडावा. म्हणजे विहिरीच्या पाण्याची पातळी खाली गेली तरी शेवटपर्यंत पाणी उपसता येईल. जमिनीवरची मोटार वापरली तर पाण्यापासून मोटारीपर्यंत पाणी पोहोचायचे काम हवेच्या दाबाकडून होत असल्याने जसजसे पाणी खाली जाते तशी वीज खर्च होऊनही पाणी मात्र कमी मिळते. टाकी उंचावर हवी : ज्या शेतकऱ्यांकडे ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर जास्त आहे. ते शेतकरी काही वेळा पाईपलाईनमधील जास्तीचे पाणी परत उद्भवात टाकण्यासाठी किंवा दाब येऊ नये म्हणून बायपास यंत्र बसवतात. यात जास्तीचे पाणी परत उ्भवतात सोडले जात असल्याने विजेचा अपव्यय होतो . त्याऐवजी शेताच्या वेगवगळ्या तुकड्यांत पाणी वापरुन झाल्यावर शेवटच्या अधिक उंचीच्या भागात शेततळे अथवा मोठी टाकी बांधावी. त्यात हे जास्तीचे पाणी साठवावे. त्याने विजेची बचत होतेच पण जेव्हा वीज जाते तेव्हा त्या उंचावर साठविलेल्या जास्तीच्या पाण्याचा उपयोग होतो. वेगवेगळ्या आकाराची वळणे : पाईपच्या कंपन्या पूर्वी पाईपलाईनचे व्हॉल्व किंवा टी तयार करताना शक्यतो काटकोनातच करायचे. अलिकडे काही कंपन्यांनी गरजेनुसार ९०, १२०, १४० अंश अशा पाहिजे त्या वळणात हे जोड बनवले आहेत. एकदा ९० डिग्रीच्या कोनात वळवून पुन्हा वळत जाणाऱ्या पाईपलाईनमुळे पाणी वाहताना जास्त प्रतिरोध होतो. त्यातून कमी पाणी मिळते व वीजही जास्त वापरली जाते. त्यामुळे काटकोणाऐवजी वळणदार व्हॉल्वचा वापर करावा. शिवाय पाईपचे जॉईंट कमी अधिक आकाराचे न वापरता पाईपच्या आकाराचेच वापरावेत. फिल्टरचा आकार : बरेच शेतकरी सँड फिल्टर वापरण्याऐवजी पाईपलाईनच्या रूंदीचेच स्किन फिल्टर वापरतात. तेही बहूदा ठिबकच्या शेवटी असते. त्यामुळे येणाऱ्या पाण्याला कमी रुंदीच्या स्क्रिन फिल्टरमधील जाळीचा अडथळा येवून कमी पाणी बाहेर पडते व मागच्या सर्व लाईनवर अनाश्यक दाब राहतो. म्हणून ३ इंची पाईपलाईनवर ४ इंची फिल्टर बसवावा, तसेच जेव्हा त्याच पाईपलाईनमधून प्रवाही पध्दतीने पाणी द्यायचे तेव्हा फिल्टरमधील जाळी काढून टाकावी तसेच ती वारंवार स्वच्छ व योग्यवेळी बदलावी. तसेच मुख्य पाईपलाईनवर वेगवेगळ्या शेतात किंवा शेतपट्ट्यात बारी काढतानाही उंच न काढता शक्यतो जमिनीपासून फक्त ६ इंचावर असावीत. लहान हौदाचा वापर : काही शेतकरी लवणातील विहिरीचे पाणी लांबच्या उंचावरील विहिरीत साठवून ठेवतात. परंतु विहिरीत साठवलेले पाणी खडकात  जिरते. त्यामुळे उंचावरील जमीनीवरच एखादे लहान शेततळे किंवा सिमेंटचा हौंद बांधून त्यात पाणी साचावे. नंतर ते हवे तसे ठिंबक, तुषार सिंचनासाठी वापरता येऊ शकते. याच पद्धतीचा शेतकऱ्यांनी वापर केला तर थेंब थेंब पाणी तर वाचेलच, पण विजेच्या प्रत्येक युनिटचीही बचत होईल.  - प्रा. बी. एन. शिंदे -