शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मिनीबस उलटून १ ठार, १२ जखमी

By admin | Updated: March 28, 2017 15:50 IST

लातूरहून उदगीरकडे निघालेली भरधाव मिनीबस उलटून १ ठार तर १२ जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी उदगीर तालुक्यातील करडखेल पाटीजवळ घडली़

ऑनलाइन लोकमतउदगीर / हेर (जि. लातूर), दि. 28 : लातूरहून उदगीरकडे निघालेली भरधाव मिनीबस उलटून १ ठार तर १२ जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी उदगीर तालुक्यातील करडखेल पाटीजवळ घडली़ एमएच १२ सीएच ४९७४ क्रमांकाची मिनीबस लातूरहून प्रवासी घेऊन उदगीरकडे निघाली होती़ दरम्यान, दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही भरधाव मिनीबस करडखेल पाटीजवळ आली असता चालकाचा ताबा सुटून रस्त्याशेजारी उलटली़ या घटनेत कादरी बदरुद्दीन शफाउल्ला कादरी (५२ रा़उदगीर) यांचा जागीच मृत्यू झाला़ तर श्वेता सोमनाथ कांबळे (५), सुषमा सोमनाथ कांबळे (४), कुमार सोमनाथ कांबळे (७), हेमलता सोमनाथ कांबळे (२०), आरुष सोमनाथ कांबळे (२), बालिका चंद्रकांत बरगे (३०, सर्व रा़ शिरुर अनंतपाळ), शिवाजी मारोती शेल्हाळे (३८, थेरगाव), सुवर्णा विठ्ठल जावीर (३०, बरकतनगर, लातूर), जनाबाई संतोष आडे (३०, महाराणाप्रताप तांडा, लातूर), सूर्यकांत तातेराव कांबळे (५०, रा़येरोळ) व नागरबाई गंगाधर गायकवाड (६०, रा़डिग्रस) हे १२ प्रवासी जखमी झाले आहेत़ त्यांना उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपारासाठी दाखल करण्यात आले आहे़ दरम्यान, श्वेता, सुषमा व कुमार कांबळे या बालकांना या घटनेत अधिक मार लागल्याचे डॉक्टरांनी सांगितले़ याप्रकरणी मिनीबस चालकावर उदगीर ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे़आॅटो चालकाचे प्रसंगावधाऩ़़मिनीबस उलटल्याची माहिती मिळताच करडखेल पाटीवरील पोलीस कर्मचारी मोहन सूर्यवंशी तसेच युवक गजानन बिरादार, गजानन पांचाळ तसेच आॅटो चालक राजू कसबे व इतरांनी घटनास्थळी धाव घेतली़ त्यांनी जखमींना बसबाहेर काढले़ आॅटो चालक कसबे यांने क्षणाचाही विलंब न लावता जखमींना आपल्या आॅटोतून उदगीरला उपचारासाठी हलविले़