शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

लाखोंच्या गर्दीत हत्ती मिरवावा का?

By admin | Updated: January 5, 2015 00:37 IST

आपत्ती व्यवस्थापनाचे काय? : पाल यात्रेतील घटनेने उपस्थित केले ‘हत्ती’एवढे प्रश्न!

सातारा : हत्तीसारख्या महाकाय वन्यजीवाला तीन लाखांच्या गर्दीत मिरविणे योग्य की अयोग्य, मिरवायचेच असेल तर त्यासाठी कोणती पथ्ये पाळली पाहिजेत, आपत्कालीन प्रसंग ओढवल्यास जबाबदारी कुणाची, यात्रेच्या नियोजनात अशा संभाव्य आपत्तींचा विचार केला जातो का, असे ‘हत्ती’एवढे प्रश्न पाल यात्रेत शनिवारी घडलेल्या घटनेने उपस्थित केले आहेत.पाल येथील खंडोबाच्या यात्रेत शनिवारी काही कारणांनी हत्ती बिथरला आणि धावपळ उडाली. चेंगराचेंगरीत एका वृद्धेला जीव गमवावा लागला, तर अनेकजण जखमी झाले. अनेक वर्षे निर्विघ्नपणे सुरू असलेल्या मिरवणुकीत यंदाच असे कसे घडले, याबाबत जिल्ह्यात सर्वत्र चर्चा सुरू आहे. प्राणिमित्रांपासून वन विभागाच्या अधिकाऱ्यांपर्यंत सारेच याविषयी गंभीरपणे विचार करीत आहेत. ‘लोकमत’ने यासंदर्भात संबंधितांची मते जाणून घेतली असता, हत्तीला लाखोंच्या गर्दीत नेणे हत्ती आणि माणूस दोघांच्याही दृष्टीने अयोग्य असल्याचे मत अनेकांनी नोंदविले. आपत्कालीन व्यवस्थापनाचा विषयही ऐरणीवर आला असून, मांढरदेवप्रमाणे मोठी दुर्घटना घडल्यावरच आपत्कालीन यंत्रणेचा विचार होणार का, असाही प्रश्न विचारला जात आहे.हत्ती हा ‘शेड्यूल वन’मधील प्राणी आहे. या यादीतील केवळ हत्तीच पाळण्यास परवानगी दिली जाते. तथापि, ज्यांनी हत्ती पाळला आहे, त्यांनी तो कोठून आणला, त्याची कायदेशीर कागदपत्रे त्यांच्याकडे आहेत का, याची पडताळणी गांभीर्याने होत नसल्याचा प्राणिमित्रांचा आक्षेप आहे. पाळीव हत्तींचे आरोग्य, अन्न, औषधोपचार, शारीरिक स्थिती, वाढ यावर लक्ष ठेवणे मालकाबरोबरच वन विभागाचेही कर्तव्य आहे. एकंदरीत रामप्रसादने शनिवारच्या प्रसंगानंतर विविध प्रश्न उपस्थित केले असून मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाला त्याप्रश्नांची उत्तरे शोधावीच लागणार आहेत. (लोकमत टीम)मांढरदेव यात्रेत चेंगराचेंगरीची घटना घडल्यानंतरच उपाययोजना करण्यात आल्या. पाल यात्रेत मोठी दुर्घटना टळली. प्रश्न असा की, यात्रेच्या नियोजनासाठी ज्या बैठका घेतल्या जातात, त्यात या यात्रेत एक वन्यजीव फिरविला जाणार असल्याने ऐन वेळी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते, या मुद्द्याचा विचार केला जातो की नाहीच? असा प्रसंग घडल्यास तो हाताळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज नसते, असाच अनुभव आहे.- सुनील भोईटे, मानद वन्यजीवरक्षक, सातारादेवस्थानांमध्ये पाळल्या जाणाऱ्या हत्तींना बऱ्याच वेळा आजार असतात; पण कोणीही ते गांभीर्याने लक्षात घेत नाही. ‘पेटा’सारख्या संस्थांनी हस्तक्षेप करून असे हत्ती सक्षम आहेत का, याची तपासणी केली पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी लोकांवर नियंत्रण राहत नाही आणि काही घडले तर प्राण्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. हे अयोग्य असून, हत्तीसारख्या प्राण्यांना गर्दीत फिरविणे बंद केले पाहिजे.- सुनेत्रा भद्रे, उच्च न्यायालयाच्या कायदा समिती सदस्या, सातारा‘कागदोपत्री’ झाला होता विचारपाल यात्रेतील मिरवणुकीत हत्तीचा वापर होणार असल्यामुळे वन खात्याची ‘टीम’ तेथे पाठविण्यात यावी, असे पत्र पोलिसांकडून वन विभागाला मिळाले होते. तथापि, सातारा परिसर हे हत्तींचे वावरक्षेत्र नसल्यामुळे वन विभागाकडे हत्तीविषयक तज्ज्ञ असणे अशक्यच. त्यामुळे वन विभागानेही तशी ‘टीम’ पुरविणे शक्य नसल्याचे पोलिसांना कळविले होते, अशी माहिती मिळाली. याप्रश्नी केवळ ‘कागदोपत्री’ विचारविनिमय करणे कसे अयोग्य होते, हे आता स्पष्ट झाले असून, वन विभाग गंभीर झाला आहे. हत्ती पाळण्याची परवानगी घेण्यासाठी जो अर्ज करावा लागतो, त्यात तो कोणत्या कारणासाठी वापरला जाणार आहे, याचा उल्लेख करावा लागतो. हा हत्ती मिरवणुकीत वापरला जाणार आहे, असा उल्लेख परवानगी अर्जात होता का, हे पाहावे लागेल. तसेच हत्तीची सहनशक्ती किती आहे, याचा अंदाज घेऊनच तितका वेळच त्याचा वापर मिरवणुकीत करणे योग्य आहे. पाळीव हत्ती सुस्थितीत आहे का, हे पाहणे वनखात्याचीही जबाबदारी आहे. - डॉ. अमित सय्यद, अ‍ॅनिमल वेल्फेअर आॅफिसरऔंध आणि पाल येथील दोन्ही हत्तींना पाळण्याची प्रमाणपत्रे आहेत. गर्दीच्या ठिकाणी हत्तींचा वापर करू नये, अशा मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारने नुकत्याच केल्या आहेत. अर्थात हा ‘कायदा’ नसल्याने असे प्रकार रोखण्यासाठी काय करता येईल, याचा अभ्यास मी करीत आहे. पुढील वर्षीपासून हत्ती आणि यात्रेकरू दोहोंच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या जातील. त्यासाठी जिल्हा प्रशासनाशी सल्लामसलत केली जाईल.- एन. आर. प्रवीण, उपवनसंरक्षक, साताराकाशीळ : पाल देवस्थानचा ‘रामप्रसाद’ ३५ वर्षांचा आहे. १९९१ पासून तो देवस्थानच्या सेवेत आहे. तेव्हापासून आतापर्यंत प्रत्येक वर्षी मिरवणुकीत भंडारा-खोबऱ्याची उधळण झेलून तो झुलतो आहे. देवस्थान ट्रस्टतर्फे त्याच्या खाण्या-पिण्याचा खर्च आणि देखभाल केली जाते. देखभालीसाठी दोन माहूत आहेत. वाहिद रहिमतुल्ला शेख आणि जावेद रहिमतुल्ला शेख अशी दोघांची नावे असून, औंंध संस्थानचा हत्ती सांभाळण्याचा प्रदीर्घ अनुभव दोघांना आहे. त्यांचे आजोबा औंंध संस्थानच्या सेवेत होते. तेव्हापासून हत्ती सांभळणारी ही तिसरी पिढी. ऊस, ओला शाळू, कडबा, गवत हे ‘रामप्रसाद’चे खाद्य. गवताच्या सुमारे दोनशे पेंड्या तो रोज फस्त करतो. याखेरीज २५ किलो गहू, २५ किलो तांदूळ याचा भरडा करून, चवीप्रमाणे गूळ घालून ‘रामप्रसाद’ला खाऊ घातला जातो. हुशार आणि शांत हत्ती अशी ‘रामप्रसाद’ची ओळख आहे.असा बिथरला ‘रामप्रसाद’रामप्रसाद निरोगी असल्याचा देवस्थान दावा असून, त्याच्या पुष्ट्यर्थ पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या प्रमाणपत्राचा हवाला दिला जातो. मिरवणुकीतील भंडाऱ्या-खोबऱ्याची त्याला सवय असल्याचे सांगितले जाते. पंधरा दिवस ते तीन आठवडे मिरवणूकमार्गाचा सराव देऊन मगच ‘रामप्रसाद’ला मिरवणुकीत सामील करून घेतले जाते. यावर्षी भाविकाने उधळलेल्या लोकरीमुळे ‘रामप्रसाद’ बिथरल्याचे सांगतले जाते. या यात्रेत कधीच लोकर उधळली जात नाही. उधळलेल्या लोकरीचे धागे ‘रामप्रसाद’च्या सोंडेत गेल्यामुळे तो अस्वस्थ झाला. त्याच वेळी त्याचा पाय खड्ड्यात गेला आणि तो बिथरला.बेटा शांत... खडे रहे... खडे रहे...बेटा शांत... खडे रहे... खडे रहे...‘खडे रहे... खडे रहे... बेटा शांत हो जा!’ हे वाक्य कोणा वडिलांचे मुलासाठी नसून ते आहेत पाल येथील बिथरलेला ‘रामप्रसाद’ हत्तीच्या माहुताच्या तोंडची. पाल येथील यात्रेसाठी लाखो भाविका दुतर्फा उभारलेले असतानाच डोळे व सोडेंत लोकरीचे केस गेल्याने रामप्रसाद गोंधळला. अन् त्यात खड्ड्यात पाय गेल्याने त्याचा तोल गेला. यामुळे भाविकांचीही पळापळ सुरू झाली. या गर्दीत रामप्रसादला शांत करणे गरजेचे होते. मात्र, प्रत्येकजण जीव वाचविण्यासाठी पळत होता. त्याच वेळी हत्तीला आजवर सांभाळ करणारे वाहिद शेख हे हत्तीवर बसले होते. तर त्यांचा भाऊ जावेद हा सोंडेला धरून चालला होता. घटना घडल्यानंतर जावेद शेवटपर्यंत सोंड धरूनच होता. दोघे भावंडे हत्तीला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. हत्तीला केवळ यांचीच भाषा समजत असल्याने ते दोघेही ‘खडे रहे... खडे रहे... बेटा शांत हो जा..!’ असे सांगत हाताने थोपटत शांत करण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी त्यांच्या मदतीला देवस्थान व यात्रा कमिटीचे सदस्यही प्रयत्न करत होते. चोवीसवर्षांची दोस्तीपाल देवस्थानच्या ‘रामप्रसाद’ला १९९१ मध्ये पाल येथे आणले. त्यावेळीपासून त्याचा सांभाळ रहिमतुल्ला शेख हे करत होते. त्यावेळी रामप्रसादचे वय तेव्हा बारा वर्षे होेते. रामप्रसाद जसजसा मोठा होत होता त्याचबरोबरच त्याचे दोस्त वाहिद आणि जावेद (रहिमतुल्ला शेख यांची मुलं)ही मोठी होत होती. एवढा अवाढव्य प्राणी; पण त्याच्या अंगाखांद्यावर खेळत, कधी लाड करत तर कधी त्याच्याशी मस्ती केली जात होती. याच प्रकारे त्याची दोस्ती घट्ट होत होती. रहिमतुल्ला यांच्याबरोबरच वाहिद व जावेद हत्तीचा सांभाळ करत होते. अन् शनिवारच्या दुर्घटनेत त्यांच्यातील दोस्तीच रामप्रसादला शांत करण्यासाठी कामी आली. सोंडेत लोकर गेली अन् हत्ती बिथरला सातारा : सोंडेत लोकर गेल्यामुळेच पालच्या खंडोबा यात्रेतील हत्ती बिथरला असल्याचे स्पष्ट झाले आहे. हत्ती बिथरण्याचा उलगडा पोलिसांना झाला असला तरी लोकर कोणी उधळली याचा शोध येथील गर्दीमध्ये पोलिसांना घेता आला नाही. घडलेल्या घटनाक्रमाची माहिती पोलीस खासगी वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींकडून संकलन करत आहेत. पालच्या खंडोबा यात्रेच्या मुख्य दिवशी खंडोबा-म्हाळसा विवाह असतो. शनिवार, दि. ३ रोजी झालेल्या या विवाह सोहळ्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यांतून लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. दुपारी मिरवणूक सुरू झाली आणि भाविकांचा ‘यळकोट-यळकोट जय मल्हार’चा गजर सुरू झाला. तारळी नदीपात्रातून मिरवणूक पुढे सरकत असतानाच गर्दीतील एका भाविकाने हत्तीवर लोकर उधळली. यापैकी काही लोकर हत्तीच्या डोळ्यात गेली, त्यामुळे हत्ती चलबिचल झाला. यावेळी हत्तीने सोंड वर करून लोकर झटकण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत दुसऱ्या कोणीतरी आणखी लोकर उधळली आणि ही लोकर थेट हत्तीच्या सोंडेत गेली. यामुळेच हत्ती बिथरला आणि एकच गोंधळ उडाला. हत्ती बिथरल्यानंतर एक मिनिटाचा हा थरार अनेकांच्या अंगावर शहारे आणणारा होता. हत्तीवर बसलेले मानकरी बाजूला पडले. याचवेळी हत्तीच्या उजव्या पायाखाली एक महिला आल्याचे चित्रफितीत स्पष्टपणे दिसत आहे. दरम्यान, या दुर्घटनेत एक महिला मृत तर एक जखमी झाली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी गर्दी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला; अन्यथा या ठिकाणी दुसरे मांढरदेव घडण्यास वेळ लागला नसता, अशी प्रतिक्रियाही या निमित्ताने उमटली आहे.पोलिसांवरील ताण वाढला...पालचा खंडोबा आणि मांढरदेवची काळुबाई यात्रा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या यात्रा आहेत. दोन्ही यात्रेमध्ये लाखो भाविक हजेरी लावतात. त्यातच २००५ मध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर मांढरदेवच्या काळुबाईची यात्रा अगदी जागतिक पातळीवर पोहोचली आहे. पालच्या खंडोबा यात्रेसही लाखो भाविकांची हजेरी असते. याचा सर्वात मोठा फटका पोलिसांना बसतो. चार दिवस पाल यात्रेत बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडल्यानंतर लगेचच मांढरदेव यात्रेच्या बंदोबस्तासाठी जाणे भाग पडते. माहूत होते म्हणून...पाल यात्रेत हत्ती बिथरल्यानंतर त्याला नियंत्रणा आणणे अशक्य होते; मात्र ही कामगिरी वाहिद व जावेद या भावंडांनी म्हत्प्रयासाने पार पाडली आहे. ज्यावेळी हत्ती बिथरला त्यावेळी भाविक एका बाजूला पळत होते, तर दुसरीकडे हत्ती नियंत्रणात आणण्यासाठी दोन्ही माहूत प्रयत्न करत असल्याचे काही चित्रफितींमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.हजारो टन खोबऱ्याची नासधूस...पाल येथे यात्रेत खंडोबा-म्हाळसा विवाह सोहळ्यात हळदीचा भंडारा आणि खोबऱ्याची उधळण होते. येथे येणारा प्रत्येक भाविक एक किलो ते पाच किलो अथवा त्याच्यापुढेही जात खोबऱ्याची उधळण करतो. प्रत्येकी जरी एक किलो खोबऱ्याची उधळण गृहित धरली तरी हा आकडा सहा लाख किलोंवर सपास जातो. याचाच अर्थ पालच्या यात्रेत लाखो किलो खोबऱ्यांची उधळण होते. दरम्यान, भंडारा म्हणून जी हळद उधळली जाते त्यामध्येही काही प्रमाणात केमिकल असल्याचा दावा पोलिसांचा आहे.