शहरं
Join us  
Trending Stories
1
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
2
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
3
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
4
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
5
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
6
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
7
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
8
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
9
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
10
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
11
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
12
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
13
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
14
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
15
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
16
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
17
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
18
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
19
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
20
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!

दूध, भाज्या रस्त्यांवरच

By admin | Updated: June 6, 2017 06:37 IST

संपकरी शेतकऱ्यांनी सरकारविरोधात पुकारलेल्या ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : संपकरी शेतकऱ्यांनी सरकारविरोधात पुकारलेल्या ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुंबई वगळता राज्यातील बहुतांश बाजारपेठा बंद असल्याने शेतीमालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्णत: ठप्प झाले. तर आंदोलकांनी जागोजागी रास्ता रोको केल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. जाळपोळीच्या किरकोळ घटना वगळता बंद शांततेत पार पडला. मात्र ३०७ बाजार समित्यांपैकी ३०० मध्ये व्यवहार सुरू होता, असा दावा सरकारने केला आहे.१ जूनपासून संपावर असलेल्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले अल्पभूधारकांच्या कर्जमाफीसह इतर निर्णय अमान्य करत ५ जून रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या हाकेला राज्यातील शेतकरी, शेतमजूर, अडते, व्यापारी व दूध संकलकांनी चांगला प्रतिसाद दिला. संपाला विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा दिला होता. कोल्हापुरात दूध व भाजीपाल्याची आवक-जावक पूर्णपणे ठप्प झाली. ‘गोकुळ’, ‘स्वाभिमानी’, ‘वारणा’ दूध संघाचे साडेबारा लाख लीटर दूध संकलन न झाल्याने सुमारे सहा कोटींचा फटका बसला आहे. साताऱ्यात राष्ट्रीय महामार्गावर जाळपोळीची घटना घडली. टायर पेटविण्यात आल्याने महामार्गावरील वाहतूक खोळंबली. खान्देशात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. जळगावात मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली, तर धुळे येथे रास्ता रोको करणाऱ्या १५० जणांना पोलिसांनी अटक केली. अहमदनगर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातही बंदला प्रतिसाद मिळाला. नगर जिल्ह्यातील सर्व व्यापारपेठा बंद होत्या. तर पुणे शहर वगळता जिल्ह्यात बंद पाळण्यात आला.शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला मराठवाड्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. अर्धापूर (जि. नांदेड) तालुक्यातील महादेव पिंपळगाव येथे रास्ता रोको आंदोलनानंतर पाच बसना लक्ष्य करण्यात आले. उस्मानाबाद जिल्ह्यात आंदोलकांनी ५ बसचे नुकसान केले़, तर आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) येथे वाहनावर दगडफेक केली. हे प्रकार वगळता सर्वत्र शांततेत बंद पाळण्यात आला.विदर्भात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. रामटेकमध्ये मात्र बंद दरम्यान झालेल्या हिंसक घटनेने गालबोट लागले. रामटेक शहरात भाजपा व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हॉटेल बंद करण्यावरून वाद झाल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. दरम्यान, राज्यभरातील ३०७ बाजार समित्यांपैकी ३०० बाजार समित्यांमध्ये व्यवहार झाले असून शेतकऱ्यांच्या आडून राजकीय पक्षांनीच या आंदोलनात सक्रिय सहभाग घेत मोर्चा, दगडफेक, कृषीमालाची नासधूस, जाळपोळ आदी कृत्य केले, असा दावा सरकारने केला आहे. कुणी कुठे आंदोलने केली त्याची यादीच प्रसारमाध्यमांना देण्यात आली असून त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यकर्त्यांची नावे आहेत.>नवी सुकाणू समितीशेतकरी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी नवी सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये शेती अर्थतज्ज्ञ गिरधर पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी, डॉ. बुधाजीराव मुळीक, रघुनाथदादा पाटील, आ. बच्चू कडू, विजय जावंधिया, कॉ. अजित नवले, राजू देसले, गणेश काका जगताप, चंद्रकांत बनकर, एकनाथ बनकर, शिवाजी नाना नानखिले, गणेश कदम, करण गायकर, हंसराज वडघुले, अनिल धनवट आदी २१ जणांचा समावेश आहे. -वृत्त/४ंमंत्री म्हणाले, स्वामीनाथन हे तर अभिनेते!जागतिक पातळीवर शेती संशोधक म्हणून ख्याती असलेल्या स्वामीनाथन यांना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘दक्षिणात्य अभिनेता’ म्हटल्याने शेतकरी नेत्यांनी संताप व्यक्त केला. मंत्र्यांस स्वामीनाथन माहिती नाहीत, याची लाज वाटते, अशा शब्दांत किसान सभेने रोष व्यक्त केला.आंदोलन आणि संपाच्या नावाखाली शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे पाप विरोधी पक्ष करीत आहेत. खऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करायला आम्ही सदैव तयार आहोत. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री राज्यातील सरकार शेतकरीविरोधी आहे. या सरकारला पाठिंबा दिल्याचा आपल्याला मोठा पश्चात्ताप होत आहे. आता लवकरच राज्य कार्यकारिणीची बैठक घेऊन सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला जाईल, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी सांगितले.

>एक किलोमीटर लांबीचे हमीपत्र

‘कर्जमाफी केली तर, शेतकरी आत्महत्या करणार नाही याची हमी देता का,’ असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात विरोधकांना विचारला होता. मुख्यमंत्र्यांच्या या प्रश्नाला उस्मानाबाद जिल्ह्यातील खामसवाडीतील शेतकऱ्यांनी उत्तर दिले असून ‘कर्जमाफी द्या, आत्महत्या करणार नाही’ अशी ग्वाही देणारे तब्बल एक किलोमीटर लांबीचे ‘हमीपत्र’ मुख्यमंत्र्यांना पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.