शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

मिखाईलने दिले पुरावे?

By admin | Updated: August 28, 2015 02:31 IST

शीनाची हत्या इंद्राणीनेच केली, ती का केली हेही मला माहीत आहे, वेळ आल्यावर मी सर्व माहिती उघड करेन, असा दावा करणाऱ्या मिखाईल दासचा जबाब गुरुवारी मुंबई पोलिसांच्यविशेष

- जयेश शिरसाट,  मुंबई/गुवाहाटीशीनाची हत्या इंद्राणीनेच केली, ती का केली हेही मला माहीत आहे, वेळ आल्यावर मी सर्व माहिती उघड करेन, असा दावा करणाऱ्या मिखाईल दासचा जबाब गुरुवारी मुंबई पोलिसांच्यविशेष पथकाने गुवाहाटीतील दिसपूर पोलीस ठाण्यात नोंदवला. गुरूवारी पोलीस निरिक्षक केदार पवार व पथकाने थेट गुवाहाटी गाठून मिखाईलचा जबाब नोंदवला. दिसपूर पोलीस ठाण्यात येताना मिखाईलने सोबत एक लिफाफा आणला होता. त्यात त्याने काही छायाचित्रे व माहिती आणली होती. सूत्रांनुसार मिखाईलने इंद्राणीने आपल्या मुलांवर केलेल्या अत्याचारांचे, वाईट वागणुकीचे आणि शीनाच्या हत्येशी संबंधात महत्वाची माहिती मुंबई पोलिसांना पुरवली आहे.मिखाईल हा शीनाचा सख्खा भाऊ असून इंद्राणी व सिद्धार्थ दास यांचा मुलगा आहे. शीना व मिखाईल ही इंद्राणी आपली भावंडे असल्याचे इंद्राणीने आजवर सर्वांना भासवले होते. लहानपणापासून इंद्राणीच्या आई-वडिलांनी या दोघांना सांभाळले. आता आजी-आजोबा आजारी असून मी मुंबईला जबाब नोंदविण्यासाठी येणे शक्य नाही, असे मिखाईलने सांगितले होते. दरम्यान, मिखाईल बोरा याला आता जीवाची भीती भेडसावू लागली आहे. माझ्या जीवाला धोका असून मी पुढील लक्ष्य ठरू शकतो, अशी भीती त्याने वर्तवली आहे. मिखाईल वोरा याला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी पाचारण केले होते. पण त्याने एकट्याने येण्यास असमर्थता दर्शविली आहे. जीवाला धोका असल्याने येऊ शकत नसल्याचे त्याने कळविले आहे. त्याची लवकरच चौकशी केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्याने असमर्थता दर्श विल्यामुळेच मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्याने गुवाहाटीला जाऊन मिखाईची तासभर चौकशी केली.मलाही बोलवत होती कोलकात्यालाइंद्राणीने शीनापाठोपाठ मिखाईलच्याही हत्येचा कट आखला होता, असाही अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. त्याबाबत मिखाईलने मुंबई पोलिसांना सांगितले की, दोनेक वर्षांपुर्वी इंद्राणीने मलाही कोलकात्यात येण्यास बजावले होते. तेथे चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देते, असे आमीषही दाखवले होते. मात्र तिचा मनात सुरू असलेल्या कपटाचा अंदाज मला आधीपासूनच होता. त्यामुळे मी तिला नकार दिला. मी जर कोलकात्याला गेलो असतो तर तिने माझीही शीनाप्रमाणेच हत्या केली असती.मी पुढचे लक्ष्य असेनगुरुवारी आजी-आजोबांच्या घराबाहेर मिखाईल पत्रकारांशी बोलताना माझ्या जीवाला धोका असल्याचे मिखाईल म्हणाला. मी पुढील लक्ष्य ठरेल, अशी भीती मला वाटू लागली आहे. पोलिसांनी मला चौकशीसाठी मुंबईला जावे लागल्यास माझ्या मित्रांना मी माझ्या सोबत नेऊ इच्छितो. कारण मुखर्जी दाम्पत्य उच्चभू्र वर्गातील आहे आणि माझ्यासोबत काहीही होऊ शकते. माझ्या बहिणीच्या हत्येबाबतचे संपूर्ण सत्य समोर आणण्यासाठी मी पोलिसांची यथाशक्ती मदत करेल, असे मिखाईल म्हणाला. या हत्याकांडामागे संपत्तीचा वाद हेही कारण असू शकते, असे संकेतही त्याने दिले. शीना माझी मोठी बहीण होती आणि मला न्याय हवा, असेही तो म्हणाला.संजीव खन्नाला पाच दिवसांचा ट्रान्झिट रिमांड शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिचा पूर्वाश्रमीचा पती आणि या प्रकरणातील एक आरोपी संजीव खन्ना याची जामीन याचिका येथील एका न्यायालयाने गुरुवारी फेटाळली; शिवाय त्याला पाच दिवसांसाठी मुंबई पोलिसांच्या कोठडीत दिले.इंद्राणीचा दुसरा पती संजीव खन्ना याने कोलकाता येथील न्यायालयात हत्येत प्रत्यक्ष सहभाग घेतल्याचा आरोप फेटाळून लावला. त्याने न्यायालयाला सांगितले की मी इंद्राणीच्या गाडीत होतो. इंद्राणीने शीनाची गळा आवळून हत्या केली. मात्र मी हत्येत सहभाग घेतला नाही.