शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मध्यमवयीन व्यक्तीला मिळाले ‘तरुण हृदय’

By admin | Updated: April 27, 2016 11:17 IST

हृदयाचा दुर्धर आजार असणाऱ्या राजस्थानातील ४३ वर्षीय पुरुषास उपचारासाठी मुंबईत दाखल करण्यात आले होते.

मुंबई : हृदयाचा दुर्धर आजार असणाऱ्या राजस्थानातील ४३ वर्षीय पुरुषास उपचारासाठी मुंबईत दाखल करण्यात आले होते. या व्यक्तीला सुरतमधील १७ वर्षीय तरुणाचे हृदय मिळाल्याने जीवनदान मिळाले आहे. सुरत ते मुंबई हे २९६ किमीचे अंतर अवघ्या १ तास १५ मिनिटांत कापून हृदय मुंबईत आणण्यात आले. राजस्थानातील अल्वर येथे राहणाऱ्या ४३ वर्षीय पुरुषास डायलेटेड कार्डिओमायोपॅथी हा आजार झाला होता. या आजारात हृदयाच्या धमण्या घट्ट होतात. त्यामुळे हृदयाला होणाऱ्या रक्तपुरवठ्यात अडथळे निर्माण होतात. या आजारावर शेवटचा उपचार म्हणजे हृदय प्रत्यारोपण हा असतो. या व्यक्तीला काही दिवसांपूर्वी उपचारासाठी मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरतच्या ग्लोबल रुग्णालयात दाखल झालेल्या १७ वर्षीय तरुणाचा अपघात झाला होता. या अपघातात त्याच्या डोक्याला जबर मार लागला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. त्या वेळी त्याच्या नातेवाइकांनी हृदय, मूत्रपिंड आणि यकृत दान करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चार जणांना जीवनदान मिळाले आहे. मुंबईत आणल्या गेलेल्या हृदयामुळे या ४३ वर्षीय पुरुषास जीवनदान मिळाले आहे. चांगल्या प्रकारे सर्वसामान्यांमध्ये जनजागृती होत आहे. त्यामुळे अवयवदानाचा टक्का वाढतो आहे. अशाच पद्धतीने अवयवदान होत राहिल्यास गरजूंना त्याचा नक्कीच फायदा होईल. अवयवदात्यांच्या कुटुंबाचे कौतुक केले पाहिजे. हृदय प्रत्यारोपण केलेल्या व्यक्तीची प्रकृती आता स्थिर आहे. त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. पुढचे ४८ ते ७२ तास त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती हृदय शल्यविशारद डॉ. अन्वय मुळे यांनी दिली. (प्रतिनिधी) >हृदयाचा प्रवास!मंगळवार, २६ एप्रिलला सकाळी १०.३३ वाजता सुरतच्या रुग्णालयातून डॉक्टर हृदय घेऊन निघाले. १०.३८ ला हृदय घेऊन डॉक्टर सुरतच्या विमानतळावर पोहोचले. १०.४१ वाजता सुरत विमानतळावरून चार्टर्ड फ्लाइट निघाले आणि ११.२० वाजता मुंबई विमानतळावर पोहोचले. ११.३१ वाजता रुग्णवाहिका विमानतळावरून निघाली आणि ११.४७ वा. रुग्णालयात पोहोचली.