शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मध्यमवर्गीयांच्या घरांची जमीन माजी आमदारांना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 05:05 IST

नागपूरच्या म्हाडा सिटी, एम्प्रेस मिल क्र. ५ च्या जमिनीवर मध्यम उत्पन्न व उच्च उत्पन्न गटाच्या लोकांसाठी म्हाडाने परवडणारी घरे बांधण्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता दिलेली असताना, गृहनिर्माण विभागाने तो प्रस्ताव रद्द

अतुल कुलकर्णी मुंबई : नागपूरच्या म्हाडा सिटी, एम्प्रेस मिल क्र. ५ च्या जमिनीवर मध्यम उत्पन्न व उच्च उत्पन्न गटाच्या लोकांसाठी म्हाडाने परवडणारी घरे बांधण्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता दिलेली असताना, गृहनिर्माण विभागाने तो प्रस्ताव रद्द करत ही जागा विदर्भातील माजी आमदारांच्या सोसायटीला देण्याचे ठरवले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने सुभाष रोड नागपूर येथील एम्प्रेस मील क्र. ५ ची जमीन राज्य हातमाग वस्त्रोद्योग मंडळाकडून ७.७५ हेक्टर जमीन २४.१३ कोटींना विकत घेतली होती. या जागेचा ताबा ३० सप्टेंबर २००९ रोजी घेण्यात आला होता. ही जमीन नागपूर शहराच्या मध्यभागी असून गृहनिर्माण योजनेकरता आवश्यक असलेल्या सर्व बाह्य सुविधा येथे उपलब्ध असल्यामुळे म्हाडाने या जमिनीवर उच्च व मध्यम उत्पन्न गटाच्या लोकांसाठी बहूमजली इमारतीत सदनिका बांधण्याची योजना आखली.त्यानुसार पहिल्या टप्प्यात भूखंड क्र. ५ वर उच्च उत्पन्न गटाच्या १६० व दुसºया टप्प्यात ९६ सदनिका बांधून पूर्ण केल्या गेल्या. आता भोगवटा प्रमाणपत्र मिळाले की ताबा देण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. असेच व एवढ्याच घरांचे काम भूखंड क्र. ६ वरती देखील पूर्ण केले गेले. त्यानंतर भूखंड क्र. ३ व ४ वरती १२० सदनिका बांधण्याच्या कामास २० जानेवारी २०१६ रोजी बी.जी. शिर्के कंपनीस वर्क आॅर्डर दिली गेली. त्यानुसार या टप्प्याचेही काम सुरू झाले.दरम्यान, भूखंड क्र. १ वर उच्च उत्पन्न गटाच्या ४६ आणि मध्यमवर्गीयांना परवडतील अशा तब्बल ५०० सदनिका मध्यम उत्पन्न गटातील लोकांसाठी बांधण्याच्या कामास मुख्यमंत्री फडणवीस यांच्याच कार्यकाळात म्हणजे ६ जानेवारी २०१५ रोजी प्रशासकीय मान्यता दिली गेली. त्याशिवाय भूखंड क्र. २ वर उच्चउत्पन्न गटासाठी २२४ सदनिका बांधण्याच्या कामासही शिर्के कंपनीस २० जानेवारी २०१६ रोजी कार्यादेश (वर्कआॅर्डर) दिली गेली.मात्र आता या तब्बल ८८० सदनिकांचे आदेश रद्द करुन ही जवळपास ७ एकर जागा माजी आमदारांचे बंगले बांधण्यासाठी देण्याचा प्रस्ताव गृहनिर्माण विभागाने तयार केला आणि तो मुख्यमंत्र्यांकडे मान्यतेसाठी पाठवला आहे.नागपुरात मध्यवर्ती भागात असणाºया या जागेवर आपलेही घर व्हावे हे मध्यमवर्गीयांचे स्वप्न या निर्णयामुळे भंग पावणार असून म्हाडाच्या मूळ हेतूलाही यामुळे हरताळ फासला जाणार आहे. यावर आता मुख्यमंत्री कोणता निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.एम्प्रेस मिलची जागा माजी आमदारांना देण्यासाठी कोणताही ठराव नागपूर मंडळाकडून पूर्वी मान्य झाल्याची नोंद नाही. या जागेवर सुरूअसलेली सार्वजनिक गृहनिर्माण योजनेची माहिती लक्षात घेता माजी आमदारांची मागणी मान्य करणे शक्य होणार नाही, असा लेखी अहवाल तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकाºयांंनी ३ आॅगस्ट २०११ रोजी पाठवला होता. तरीही त्यानंतर माजी आ. राम गुंडिले, सुधाकर गणगणे यांनी यासाठी पाठपुरावा चालू ठेवला.