शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

एमआयडीसीने 20 एकर जागा घेतली ताब्यात, छोट्या उद्योजकांना जागा देण्याची उद्योग आघाडीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 14:02 IST

औद्योगिक विकास महामंडळाने कुपवाड एमआयडीसीमधील वनीकरणप्रकरणी १९ पैकी ५ संस्थांचे भूखंड ताब्यात घेतले असून, उर्वरित १४ भूखंड ताब्यात घेण्याची कारवाई सुरू आहे.

कुपवाड : औद्योगिक विकास महामंडळाने कुपवाड एमआयडीसीमधील वनीकरणप्रकरणी १९ पैकी ५ संस्थांचे भूखंड ताब्यात घेतले असून, उर्वरित १४ भूखंड ताब्यात घेण्याची कारवाई सुरू आहे. आतापर्यंत महामंडळाने सुमारे वीस एकर जागा ताब्यात घेतली आहे. उर्वरित उद्योजकांना येत्या चार दिवसांत अंतिम नोटिसा देणार आहे, अशी माहिती प्रादेशिक अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी दिली.कुपवाड औद्योगिक वसाहत स्थापन झाल्यावर शासनाच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने या वसाहतीमधील दहा टक्के जागा वनीकरणासाठी राखीव ठेवली होती. त्यानुसार कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील अंदाजे ६२ एकर जागेवर वनीकरण व्हावे, या उद्देशाने शासनाने १९ विविध संस्थांना या भूखंडाचे वाटप केले होते. त्यावेळी संबंधित संस्थांनी या जागेवर शंभर टक्के वनीकरण करण्यची हमी देऊन काही वर्षासाठी करार करून भूखंड ताब्यात घेतले होते. परंतु या १९ भूखंडधारकांनी त्या जागेवर बांधकाम करून शासनाच्या मूळ उद्देशाचे उल्लंघन केल्याचे एमआयडीसीच्या अधिका-यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर प्रादेशिक अधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्या आदेशानुसार सर्व १९ भूखंडधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या. त्यानुसार अधिका-यांनी १९ भूखंडांपैकी सध्या ५ भूखंड ताब्यात घेतले असून, उर्वरित १४ भूखंड ताब्यात घेण्याची कारवाई सुरू आहे. आतापर्यंत सुमारे वीस एकर जागा महामंडळाने ताब्यात घेतली आहे. यातील काही जणांना येत्या चार दिवसात अंतिम नोटिसा दिल्या जाणार असल्याचे प्रादेशिक अधिकारी देशमुख यांनी सांगितले.दरम्यान, बुधवारी दुपारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक विभागाच्या अधिका-यांनी कुपवाड एमआयडीसीतील सूरज स्पोर्टस्च्या रा. म. यादव क्रीडा मैदानाची मोजणी केली. हा भूखंड शासनाने या संस्थेला मैदानासाठी दिला होता. परंतु संबंधित संस्थेने या जागेवर बेकायदेशीर बांधकाम केल्याने या संस्थेलाही एमआयडीसीने नोटीस दिलेली आहे.या संस्थेने या जागेसाठी शासनाकडे नूतनीकरणाचा अर्ज सादर केला होता. परंतु, या जागेवर संस्थेने विनापरवाना बेकायदेशीर बांधकाम केल्याने सांगली विभागीय कार्यालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला आहे. ही जागा ताब्यात घेण्यासाठी सांगली विभागाने वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला असून, या प्रस्तावात संबंधित संस्थेने बेकायदेशीर बांधकाम केल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे वरिष्ठ कार्यालयाकडून येणा-या आदेशानुसार संबंधितावर कारवाई करण्यात येणार आहे, असे देशमुख यांनी सांगितले.दरम्यान, कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील वनीकरणासाठी दिलेले प्लॉट औद्योगिक विकास महामंडळाने काढून घेतले आहेत. यापैकी दहा टक्के वनक्षेत्र राखीव ठेवून उर्वरित भूखंडाचे प्लॉट पाडून त्यांचे छोट्या गरजू उद्योजकांना वाटप करावे, अशी मागणी उद्योग विकास आघाडीचे अध्यक्ष डी. के. चौगुले, मनोज भोसले, जफर खान, चंद्रकांत पाटील, शशिकांत मसुटगे यांनी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडे केली आहे. ज्या जागा काढून घेतल्या आहेत, त्यावर एमआयडीसीच्या नावाचे फलक लावावेत, अशी मागणी उद्योग विकास आघाडीचे अध्यक्ष चौगुले यांनी केली आहे.जागा दिल्या स्वत:हून ताब्यातकुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये वनीकरणासाठी घेतलेल्या भूखंडाबाबत वातावरण ढवळून निघाले आहे. एमआयडीसीने गैरवापर करणा-यांविरोधात कठोर पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर बदनामी नको, म्हणून एका संस्थेने आपल्याकडील दोन भूखंड स्वत:हून एमआयडीसीच्या ताब्यात दिले आहेत, अशी माहिती अधिका-यांनी दिली.एमआयडीसीच्या रडारवर माजी मंत्र्याची जागाएमआयडीसीने वनीकरणासाठी दिलेल्या जागांची तपासणी केली आहे. संबंधित संस्थांनी शासनाचा मूळ उद्देश बाजूला ठेवून या भूखंडांवर बेकायदेशीर बांधकाम केल्याचे उघडकीस आले आहे. संस्थांनी केलेल्या बेकायदेशीर बांधकामांच्या यादीत एका माजी मंत्र्याच्या संस्थेचे नाव असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. त्यामुळे या माजी मंत्र्याच्या भूखंडावरही पुढील टप्प्यात कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.