मुंबई : डिजीटल महाराष्ट्राचे पुढचे पाऊल म्हणून मायक्र ोसॉफ्टच्या क्लाऊड सर्व्हिसेसचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला. या सुविधेमुळे नागरिकांना अधिक गतीशील आणि पारदर्शी सेवा देणे राज्य शासनाला शक्य होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी केले.सह्णाद्री अतिथीगृहावर आयोजित समारंभाला मायक्र ोसॉफ्ट इंडियाचे अध्यक्ष भास्कर प्रमाणिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम आदी उपस्थित होते.या सेवेमुळे उद्योगांना चालना व रोजगार निर्मितीही होणार आहे. मायक्र ोसॉफ्टच्या माध्यमातून देशातील तीन डेटा सेंटरर्सपैकी दोन सेंटर्स मुंबई व पुणे येथे सुरु करण्यात आले आहेत. सायबर सुरिक्षततेच्या दृष्टीकोनातून डेटा सेंटर्स उपयुक्त ठरणार आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराला अधिक प्रगत, अद्ययावत करण्यासाठी डिजीटल सेवांची आवश्यकता होती. डेटा सेंटर्समुळे ही गरज पूर्ण होणार आहे. मध्यंतरी मी मायक्र ोसॉफ्टच्या मुख्यालयाला भेट दिली. त्यावेळी महाराष्ट्रात स्मार्ट व्हिलेज, स्मार्ट एमआयडीसी या संकल्पना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार मायक्रोसॉफ्टतर्फे मेळघाटातील हरिसाल दुर्गम गावात नेटवर्कची उभारणी करण्यात आली.ते राज्यातील पहिले स्मार्ट व्हिलेज असेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. प्रामाणिक म्हणाले की, मायक्र ोसॉफ्ट इंडिया हे भारतातील सेवेचे रजत महोत्सवी वर्ष साजरे करत असताना या सेवेचा शुभारंभ होत आहे, ही बाब आमच्यासाठी आनंददायी आहे. महाराष्ट्रातील उत्तम पायाभूत सुविधा आणि मुंबई सारखे जागतिक दर्जाचे शहर यामुळे डेटा सेंटर्सच्या उभारणीसाठी महाराष्ट्राची निवड करण्यात आली. (विशेष प्रतिनिधी)
जलद कारभाराला मायक्रोसॉफ्टचे पंख
By admin | Updated: September 30, 2015 02:26 IST