शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसोंडेला मिळणार पाणी

By admin | Updated: August 13, 2015 02:40 IST

पिण्यासाठी व अन्य दैनंदिन वापरासाठी पुरेसे पाणी मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे, हे अधोरेखित करीत मुंबई उच्च न्यायालयाने दापोली तालुक्यातील म्हैसोंडे गावाला महिनाभरात

मुंबई : पिण्यासाठी व अन्य दैनंदिन वापरासाठी पुरेसे पाणी मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे, हे अधोरेखित करीत मुंबई उच्च न्यायालयाने दापोली तालुक्यातील म्हैसोंडे गावाला महिनाभरात नळयोजनेचे पाणी सुरू करण्याचा आदेश दिला आहे.रत्नागिरी जिल्ही परिषदेने म्हैसोंडेला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या नळयोजनेच्या बंद पडलेल्या पाइपलाइनची लगेच दुरुस्ती करून महिनाभरात सार्वजनिक नळांद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, असा आदेश न्या. अभय ओक आणि न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने दिला.ग्रामस्थांना निष्कारण कोर्टात यायला लावल्याबद्दल जिल्हा परिषदेने अर्जदारांना दाव्याच्या खर्चापोटी २५ हजार रुपये द्यावेत, असाही आदेश झाला. म्हैसोंडे आणि शेजारील वाघवे या गावांना पुरविण्याची एक योजना १९८७पासून कार्यरत होती. मात्र पाणी कमी पडू लागल्याने व पाइप गंजून आणि माती भरून बुजल्याने ही नळयोजना बंद पडली. म्हणून जि.प.ने या दोन गावांसाठी ३७ लाख रुपये खर्चाची नवी नळपाणी योजना मंजूर केली. त्यानुसार ४० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधली. परंतु वाघवे गावातील लक्ष्मीबाई वाजीरकर व इतरांनी त्यांच्या खासगी जमिनीतून पाइपलाइन टाकण्याविरुद्ध दावा दाखल करून स्थगिती मिळविली. परिणामी म्हैसोंडेला पाणी मिळेनासे झाले. (विशेष प्रतिनिधी)नवी नळयोजनाही सुरु करादिवाणी न्यायालयाने दिलेल्या स्थगितीविरुद्ध रत्नागिरी जिल्हा परिषदेने जिल्हा न्यायालयात केलेले अपील प्रलंबित आहे. जिल्हा न्यायालयाने ते येत्या ३१ डिसेंबरपर्यंत निकाली काढावे, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. तसेच त्या अपिलाचा निकाल विरुद्ध गेला तरीही जिल्हा परिषदेने वाजीरकर व इतरांची जमीन वगळून इतर ठिकाणाहून पाइपलाइन टाकून नवी नळयोजनाही त्या निकालानंतर दोन महिन्यांत कार्यान्वित करावी, असेही न्यायालयाने सांगितले आहे.