सुरेश लोखंडे - ठाणो
उल्हास व बारवीनदीच्या खो:यात पावसाचे प्रमाण चांगले असल्यामुळे आंध्रा व बारवी धरणातील पाणीसाठा मोठय़ा प्रमाणात वाढला आह़े यामुळे या दोन्ही धरणांतून पाणीपुरवठा होणा:या ठाणो जिल्ह्यातील पाच महापालिका अन् दोन नगरपालिका क्षेत्रतील भविष्यातील पाणीटंचाईला पूर्णविराम मिळाला आहे.
बारवी आणि आंध्रा धरणातून एमआयडीसी व शहाड टेमघर प्राधिकरण व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे ठाणो, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भाईंदर या पाच महापालिकांसह अंबरनाथ, कुळगाव - बदलापूर नगरपालिका, एमआयडीसी; आणि ठाणो जिल्हा परिषदेच्या 42 गावांना दररोज 1 हजार 35क् दशलक्ष घनलिटर पाणीपुरवठा केला जात आहे.
यात या लोकवस्तींसाठी व उद्योगधंद्यातील कामगारांसाठी वर्षभरात 3क्8 दशलक्ष घनमीटर पाणी पिण्यासाठी व 5क् दशलक्ष घनमीटर पाणी उद्योगधंद्यातील विविध प्रक्रियांसाठी लागत आहे. हा पाणीपुरवठा मुबलक व दीर्घकाळार्पयत करण्याच्या दृष्टीने लघुपाटबंधारे विभाग वेळोवेळी नियोजन करीत आहे.
पण सध्या नदीच्या पात्रतील पाणीच वापरले जात असल्यामुळे आता पाणीकपात रद्द करण्यात आली असल्याचे कार्यकारी अभियंता संजय निकुडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
बारवी धरणात 17क्.2क् दशलक्ष घनमीटर (दलघमी) पाणीसाठा क्षमता आहे. यापैकी या धरणात सध्या 95 टक्के म्हणजे 161.93 दलघमी पाणीसाठा तयार झालेला आहे. या धरणात आज 34 मिमी पाऊस पडलेला आहे. तर आंध्रा
धरणाची पाणीसाठा क्षमता 339.14 दलघमी आहे. या धरणात आजमितीस सुमारे 45 टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. या पाण्याचा वापर कर्जतजवळील भिवपुरी येथील टाटाच्या
जलविद्युत प्रकल्पासाठी प्राधान्याने वापरला जात आहे.
त्यानंतर पाण्याचा वापर ठाणो जिह्यातील महापालिका, नगरपालिकांना केला जात आहे.
च्वीजनिर्मितीनंतर उरलेल्या पाण्याला उल्हासनदीत सोडले जाते. या पाण्याला बदलापूरजवळ इंग्रजांनी बांधलेल्या बॅरेज या बंधा:यासह पुढे मोहने, जांभूळ या बंधा:याद्वारे अडवून त्याचा वापर महापालिका व नगरपालिकांना केला जात आहे.
च्मुंबई व ठाणो महापालिकेला पाणीपुरवठा करणा:या भातसा धरणाची पाणीसाठा क्षमता 944.1क् दशलक्ष घनमीटर आहे. यापैकी या धरणात 64क्.2क् दलघमी. म्हणजे 68 टक्के साठा तयार झाला आहे. तानसा धरणात 85 टक्के पाणीसाठा तयार झालेला आहे. मोडकसागर आधीच भरलेले आहे. याशिवाय विरार, वसई, पालघर आदी शहरांना पाणीपुरवठा करणारे सूर्या धरण ओव्हरफ्लो झाले आहे.