शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

‘मेट्रो’ला हवी ‘आरे’त आणखी जागा, १२ हजार चौ.मी. जागेची ‘आरे’कडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 05:19 IST

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ प्रकल्पाच्या कामासाठी आरे कॉलनीमध्ये आणखी १२ हजार चौरस मीटर जागा लागणार आहे; तशी मागणीच कॉर्पोरेशनने आरेकडे केली आहे.

मुंबई - मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ प्रकल्पाच्या कामासाठी आरे कॉलनीमध्ये आणखी १२ हजार चौरस मीटर जागा लागणार आहे; तशी मागणीच कॉर्पोरेशनने आरेकडे केली आहे. आरे कॉलनी येथील मरोळ भागातील सुमारे १२ हजार चौरस मीटर जागेपैकी अंडरपासच्या कामासाठी कायमस्वरूपी ५ हजार ३५२ चौरस मीटर व तात्पुरत्या बांधकामासाठी ६ हजार ४७८ चौरस मीटर असे या जागेचे स्वरूप आहे.मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने आरे कॉलनी प्रशासनाकडे पत्रव्यवहार करत अधिकच्या जागेसाठीचा प्रस्ताव मांडला आहे. मेट्रो-३ हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याने कायमस्वरूपी अंडरपास उभारण्यासाठी व दोन वर्षे तात्पुरत्या बांधकामासाठी जागेबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. आरे कॉलनीमधील ३० हेक्टर जमीन ताब्यात घेण्याबाबत आक्षेप घेतला जात असतानाच पुन्हा १२ हजार चौरस मीटर जागेची मागणी करण्यात आली आहे. कॉर्पोरेशनने दाखल केलेला प्रस्ताव आता आरे प्रशासनाकडून मंत्रालयाकडे पाठवण्यात येणार आहे.मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडे याबाबत विचारणा केली असता; जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले की, आरेचा कार डेपो भूमिगत नाही, तर जमिनीवर नियोजित आहे. डेपोलगत मरोळ-मरोशी रस्ता असून तो प्रस्तावित रॅम्पला विभागून जातो. त्यामुळे या रस्त्यावरील वाहनांची वाहतूक अबाधित ठेवण्यासाठी तेथे रेल्वेमार्गाखालून पूल (अंडरपास) बांधण्याचे नियोजित आहे.परिणामी अंडरपासच्या बांधकामासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला ५ हजार ३५२ चौरस मीटर इतक्या जागेची कायमस्वरूपी गरज आहे. बांधकामादरम्यान ६ हजार ४७८ चौरस मीटर जागेची तात्पुरत्या स्वरूपात आवश्यकता आहे. बांधकाम पूर्ण झाल्यावर कॉर्पोरेशन तात्पुरत्या स्वरूपात लागणारी जमीन संबंधित विभागास हस्तांतरित करणार आहे.जागा बळकावण्याचे कामआरे कॉलनीमधील जागा बळकावण्याचे काम सुरू आहे. विकासकांना फायदा पोहोचवण्यासाठी अजून जागेची मागणी केली जात आहे. संपूर्ण आरे कॉलनी ‘ना विकास क्षेत्र’ असताना सरकारकडून आणि एमएमआरसीकडून आरेमध्ये घुसखोरी केली जात आहे. मेट्रो-३ प्रकल्प सुरू करण्यापूर्वी आराखडे, नकाशे तयार केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे आता अधिक जागेची मागणी करण्यात येत आहे. मेट्रो-३ भूमिगत केल्यामुळे ४० हजार कोटींपेक्षा जास्त खर्च येत आहे. जर हाच प्रकल्प उन्नत केला असता तर साधारण ५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असता. विकास आराखड्यातील मेट्रो शेडसाठी राखीव जागा बळकावण्यात येत आहे. विनाकारण ४ हजार वृक्षांचा बळी देत वन उद्ध्वस्त केले जात आहे. तज्ज्ञांचे मत फेटाळून ‘विकासकांसाठी’ मार्ग तयार केला जात आहे.- डी. स्टॅलिन, प्रकल्प संचालक, वनशक्ती‘आरे’ वाचवण्यासाठी प्रयत्न नाहीचआरे कॉलनी वाचवण्यासाठी प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. आरे कॉलनीमध्ये मेट्रोचे कारशेड बनत असल्याने पर्यावरणाची हानी होत आहे. आरे कॉलनी आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर ‘ना विकास क्षेत्र’ आहे. त्यामुळे येथे कोणत्याही प्रकारची विकासात्मक कामे होता कामा नयेत. मात्र, येथे मेट्रो प्रकल्प राबविण्यात येत आहे. मेट्रोमुळे काही वर्षांत आरे कॉलनीच्या परिसरात रहदारी वाढेल. वसाहती वाढतील. वनाची तोड होईल. पर्यावरणाचा समतोल बिघडेल. मुंबईच्या हिरवळीवर घाव घालण्यात येत असून, याबाबत वेळीच पावले उचलण्याची गरज आहे.- गॉडफ्रे पिमेंटा, विश्वस्त, वॉचडॉग फाउंडेशन

टॅग्स :Metroमेट्रोMumbaiमुंबई