शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोच्या मार्गिकांना मंजुरी

By admin | Updated: October 26, 2016 04:29 IST

मुंबई मेट्रो मार्ग २ दहीसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द, मेट्रो मार्ग टप्पा २ ब डीएन नगर-मंडाळे व मेट्रो मार्ग ४ वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली या मार्गिकांना मान्यता देणारा

मुंबई : मुंबई मेट्रो मार्ग २ दहीसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द, मेट्रो मार्ग टप्पा २ ब डीएन नगर-मंडाळे व मेट्रो मार्ग ४ वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली या मार्गिकांना मान्यता देणारा आदेश नगरविकास विभागाने काढला. त्या अंतर्गत एकूण ११८ किलोमीटरचे मेट्रो जाळे उभारले जाणार आहे. हा मार्ग उन्नत स्वरुपाचा असेल. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन यांची एमएमआरडीएने नियुक्ती केली आहे. मेट्रो मार्ग २ दहीसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द मेट्रो मार्गांतर्गत टप्पा क्रमांक २ ब मध्ये डी.एन.नगर-मंडाळे दरम्यानच्या कामांची एकूण किंमत १० हजार ९८६ कोटी रु.इतकी असेल. मेट्रो मार्ग ४ वडाळा-घाटकोपर-मुुलुंड-ठाणे-कासारवडवली या प्रकल्पाची किंमत १४ हजार ५४९ कोटी रु.इतकी असेल. मेट्रो मार्ग ४ साठी केंद्रांच्या निधी उपलब्धतेची वाट न पाहता एमएमआरडीएचा निधी वापरून त्याची उभारणी करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. मेट्रो मार्ग २ ब आणि मेट्रो मार्ग ४ हे २०२१ पर्यंत पूर्ण करण्यात येतील. या प्रकल्पांसाठीच्या निधीची उभारणी वित्तीय संस्थांमार्फत करण्याची संपूर्ण जबाबदारी एमएमआरडीएची असेल. ती राज्य शासनाची असणार नाही. कर्ज हे एमएमआरडीए घेणार असले तरी आवश्यकता भासल्यास राज्य शासन त्या कर्जाला हमी देईल. मेट्रो मार्ग २ ब या ठिकाणी प्रस्तावित भाडे हे अंतरानुसार १० रुपये ते ८० रुपये इतके असेल. तीन किमीपर्यंतचे भाडे १० रुपये राहील. मेट्रो धावू लागण्यापूर्वी वित्तीय व्यवहार्यता तपासून गरज भासल्यास त्यामध्ये आवश्यक ते बदल करण्याचे अधिकार हे भाडे निर्धाण समितीला असतील. (विशेष प्रतिनिधी)