शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

हवामान खात्याने वर्तविला अंदाज पावसाचा, पडले ऊन, हवामान खात्याचा भोंगळ कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 05:36 IST

सोमवारी मुंबई शहर आणि उपनगरात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला होता. प्रत्यक्षात मात्र हवामान खात्याचा अंदाज सपशेल खोटा ठरला आणि पावसाऐवजी दिवसभर पडलेल्या उन्हामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा ‘ताप’दायक वातावरणाला सामोरे जावे लागले.

मुंबई : सोमवारी मुंबई शहर आणि उपनगरात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला होता. प्रत्यक्षात मात्र हवामान खात्याचा अंदाज सपशेल खोटा ठरला आणि पावसाऐवजी दिवसभर पडलेल्या उन्हामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा ‘ताप’दायक वातावरणाला सामोरे जावे लागले. कुलाबा आणि सांताक्रुझ येथे पावसाची अनुक्रमे १.०, १.४ मिलीमीटर एवढी नोंद झाली आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २९.३, २५.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.सोमवार, मंगळवार आणि बुधवारी मुंबई शहर आणि उपनगरात हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र मुंबईकरांचा सोमवार कोरडा गेला असून, हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आता मंगळवारसह बुधवारी पाऊस कोसळेल का? याकडे हवामान खात्यासह मुंबईकरांचे लक्ष लागून राहिले आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत कोकणात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. १९ आणि २० सप्टेंबर रोजी कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. मध्य महाराष्ट्रासह विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.>सोमवारी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्यामुळे मुंबईकरांनी जवळ छत्री बाळगली. प्रत्यक्षात पाऊस पडलाच नाही. उलट उन्हाचा कडाका वाढला. त्यामुळे अखेर पावसासाठी जवळ बाळगलेली छत्री मुंबईकरांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी उघडावी लागली.