शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांची धर्मकारणाला मूकसंमती असल्याचा संदेश

By admin | Updated: November 21, 2015 02:51 IST

साहित्यिक-कलावंतांना आत्ताच असहिष्णुता कशी आठवली? याबद्दल ‘पुरस्कार वापसी’च्या कृतीवर टीका करणारे सत्ताधारी विचारणा करत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे, अत्याचाराच्या

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर , साहित्य नगरी

साहित्यिक-कलावंतांना आत्ताच असहिष्णुता कशी आठवली? याबद्दल ‘पुरस्कार वापसी’च्या कृतीवर टीका करणारे सत्ताधारी विचारणा करत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे, अत्याचाराच्या घटनांना धर्मकारणाचा आधार देऊन त्यांचे समर्थन करण्यात येत आहे. त्या समर्थनाला आवर घालण्याचा किंचितही प्रयत्न सत्ताधारी करताना दिसत नाहीत, ही खेदाची बाब आहे. यामुळे साहित्यिक, कलावंत आणि विचारवंतांन कधीही न जाणवलेली भीती वाटत आहे. सत्ताधाऱ्यांच्या निमूट राहण्यातून त्यांची या धर्मकारणाला मूकसंमती आहे, असाच संदेश सगळीकडे जातअसल्याची परखड टीका १६व्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत पवार यांनी केली. रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या १६व्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी दादर येथील राजा शिवाजी विद्यालयाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्यनगरीत दिमाखात करण्यात आले. या प्रसंगी, मावळते संमेलनाध्यक्ष कवी अशोक नायगावकर यांनी संमेलनाच्या प्रतीकात्मक पालखीची धुरा संमेलनाध्यक्ष जयंत पवार यांच्या खांद्यावर सोपविली. यावेळी स्वागताध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशीष शेलार, कोमसापचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर, प्रा.एल.बी. पाटील, मुख्य समन्वयक शशीकांत तिरोडकर, संमेलन समिती प्रमुख रवींद्र आवटी, व्यावसायिक सुरेश हावरे, माजी नगरपाल जगन्नाथ हेगडे, सारस्वत बँकेचे संचालक किशोर रांगणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. आजची परिस्थिती लिहिणाऱ्यांसाठी, व्यक्त होऊ पाहणाऱ्यांसाठी अतिशय चिंताजनक बनली आहे. देशातील या परिस्थितीचा निषेध म्हणून काही साहित्यिकांनी आपले पुरस्कार शासनाला परत केले. त्यांची ही कृती महत्त्वाची आहे. पण तिच्यामागचा हेतू सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी तो हेतूच दूषित करुन सर्वांच्या मनात गोंधळ उडवून दिला जात असल्याचे संमेलनाध्यक्ष पवार यांनी सांगितले. सत्ताधाऱ्यांनी साहित्यिक-कलावंतांना भयमुक्त वातावरण द्यावे, एवढीच साहित्य विश्वाची अपेक्षा आहे. हे वातावरण निर्माण होण्यात आडकाठी आणणाऱ्या घटकांवर अंकुश ठेवावा, अशी माफक अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तर लेखकांनी आपल्या अनुभवांशी प्रामाणिक राहत वास्तवाचे भान वाचकाला आणून द्यावे आणि त्याचा विवेक जागवावा, अशी सूचनाही पवार यांनी साहित्यिकांना केली. (प्रतिनिधी)विचारांची चर्चा होणे हे जागरूकपणाचे लक्षण - मुख्यमंत्रीदेशाची प्रगतीकडे वाटचाल होत असताना, वेगवेगळ्या विचारांची चर्चा होणे हे जागरूकपणाचे लक्षण आहे. टीका करणे हे तर आपल्या रक्तातच असल्याचे मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी १६व्या कोकण मराठी साहित्य संमेलनात व्यक्त केले. देशाच्या संस्कृतीत, सहिष्णुतेत सगळ््या विचारांना सामावून घेण्याची ताकद आहे. असे सांगताना त्यांनी विवेकानंदांच्या शिकागो भाषणाचा आवर्जून उल्लेख केला. विविध विचारांसाठी कोकण मराठी साहित्य परिषदेचे हे व्यासपीठ एक उत्तम असल्याचेही ते म्हणाले. कोकण मराठी साहित्य परिषद आयोजित प्रबोधनकार ठाकरे व्यासपीठावर कोमसाप साहित्यमित्र पुरस्कार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. आज निवडक विचार करण्याची वेळ नाही. प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार आहे, किंबहुना हा अधिकार त्यांच्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. त्या विचारांवर विचारमंथन होणे हीच काळाची गरज आहे. त्यातून मग कोणाच्याही चांगल्या गोष्टी स्वीकारुन वाईट गोष्टींवर टीका केली पाहिजे. आज जगभरातील सर्वात तरुण देश म्हणून आपली ओळख आहे. देशाची ५० टक्के लोकसंख्या २५ वर्षांखालील आहे. ही लोकसंख्या मानव संसाधनामध्ये रुपांतरीत होणार आहे. हीच आपली विकासाची वाटचाल ठरू शकेल. या वाटचालीसाठी साहित्यिक आणि विचारवंतांवरही मोठी जबाबदारी आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री