शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Surprise; संदेश मिळाला बंदोबस्ताचा; मात्र लाभ घेतला चित्रपट पाहण्याचा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 12:08 IST

पंढरपूरच्या डीवायएसपींचे सरप्राईज : महिला व पोलीस अधिकारी, कर्मचाºयांनी पाहिला चित्रपट

ठळक मुद्देसततच्या बंदोबस्तामुळे पोलिसांना तणावात काम करावे लागतेमहिला व पुरुष पोलीस कर्मचारी बंदोबस्ताबाबत माहिती ऐकण्यासाठी रांगेत थांबलेया सरप्राईजबद्दल पोलीस निरीक्षक गजानन माळींचे समाधान व्यक्त केले

पंढरपूर : सध्या ना कोणती निवडूक, ना वारी सोहळा, ना अचानक उद्भवलेला प्रसंग़़़ तरीही सर्व पोलिसांना त्वरित बंदोबस्तासाठीचे फर्मान आले़ लागलीच पोलीस अधिकारी व कर्मचारी शहर पोलीस ठाण्यात जमा झाले़ रिपोर्टिंगलाही सुरुवात झाली़ बंदोबस्त कोठे अन् कसा करायचा... कोणत्या पॉर्इंटला थांबायचे, याबाबत सूचना मिळण्याऐवजी आपण सर्व जण एकत्रित चित्रपट पाहायला जायचंय, हे शब्द उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे व पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या तोंडातून बाहेर पडताच सर्वच पोलीस अचंबित झाले अन् त्यांच्यावरील तणाव दूर झाला.

पंढरपूर शहरात व्हीआयपींचे दौरे, निवडणूक, आंदोलने, उपोषण, यात्रा, विविध कार्यक्रम, सतत काही ना काही कारणांमुळे बंदोबस्त असतोच़ याशिवाय शहरात होणाºया मारामारी, चोºया व अन्य विविध गुन्हे यामुळे पोलिसांना सतत तणावात काम करावे लागते. यामुळे पोलिसांना तणावमुक्त करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे व पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी पंढरपूर उपविभागातील पोलिसांना सरप्राईज देण्याचे नियोजन केले होते. 

महत्त्वाचा पोलीस बंदोबस्त आहे, तुम्ही गणवेशात गुरुवारी दुपारी ३ वाजता पंढरपूर शहर, श्री विठ्ठल मंदिर समिती, पंढरपूर तालुका, पंढरपूर ग्रामीण व करकंब विभागातील पोलिसांना बुधवारी निरोप देण्यात आला. त्यानुसार निरोप मिळालेले सर्व पोलीस दिलेल्या वेळेत तयारीनिशी हजर झाले. 

महिला व पुरुष पोलीस कर्मचारी बंदोबस्ताबाबत माहिती ऐकण्यासाठी रांगेत थांबले. मात्र त्या ठिकाणी डॉ. सागर कवडे यांनी तुम्हाला सर्वांना चित्रपट पाहायला जायचे आहे, असे सांगितले. शिवाय चित्रपट पाहण्यासाठी सात गाड्या व एका बसचीही सोय केल्याचे सांगितले़ त्यानंतर सर्व जण पोलीस गाडी अन् बसमध्ये बसून मर्दानी हा चित्रपट पाहायला गेले़ त्यांच्या चेहºयावरील तणाव दूर झाल्याचे दिसून आले़ या सरप्राईजबद्दल पोलीस निरीक्षक गजानन माळींचे समाधान व्यक्त केले.

अधिकाºयांनी निभावली कुटुंब प्रमुखाची भूमिका पूर्वी कुटुंबातील सदस्यांसह चित्रपट पाहण्याचा आनंद घेतला होता. परंतु सध्या रोजच्या व्यस्त जीवनामुळे चित्रपट पाहणे, त्यासारख्या गोष्टींना वेळ देता येत नव्हता. रोजच्या तणावातून मुक्तता मिळावी, यासाठी उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे व पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी कुटुंब प्रमुखाची भूमिका निभावत चित्रपट पाहण्यासाठी नेले होते. मर्दानी-२ हा चित्रपट महिला पोलिसांना प्रोत्साहन देणारा होता. सर्व अधिकाºयांचे मनापासून आभार, अशी भावना महिला पोलीस सोनाली इंगोले यांनी सांगितले़

सततच्या बंदोबस्तामुळे पोलिसांना तणावात काम करावे लागते. पंढरपूर उपविभागातील पोलिसांना थोडा आनंद मिळावा. तसेच अधिकारी व कर्मचारी मित्राप्रमाणे एकत्र यावेत, या उद्देशाने सर्वांना चित्रपट पाहण्याचे नियोजन केले होते.- डॉ. सागर कवडे,उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर

मर्दानी-२ हा सिनेमा महिला पोलीस अधिकाºयांच्या कर्तबगारीवर प्रकाश टाकणारा व प्रोत्साहन, आत्मविश्वास वाढवणारा आहे़ शिवाय नवीन ऊर्जा, प्रेरणा देणारा, संघर्ष कसा केला जातो यावर आधारित आहे़ असा सिनेमा पोलिसांना पाहायला मिळेल, या दृष्टीने डीव्हीपी समूहाने नियोजन केले़- अभिजित पाटील,डीव्हीपी समूह प्रमुख, पंढरपूर

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस