शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकांवरील मेस्मा कायदा स्थगित, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 10:32 IST

शिवसेनेसह विरोधक आक्रमक झाल्यानंतर अंगणवाडी सेविकांवर लावण्यात आलेला 'मेस्मा' कायदा मुख्यमंत्र्यांनी स्थगित केला आहे. सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली आहे.

मुंबई- शिवसेनेसह विरोधक आक्रमक झाल्यानंतर अंगणवाडी सेविकांवर लावण्यात आलेला 'मेस्मा' कायदा मुख्यमंत्र्यांनी स्थगित केला आहे. सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली आहे. अंगणवाडी सेविकांना 'मेस्मा' लावण्यावरून काल विधान परिषदेत विरोधकांनी मोठा गदारोळ करत सरकारला विधिमंडळात चांगलंच धारेवर धरलं होतं.सरकार अंगणवाडी सेविकांवरील मेस्मा रद्द करत नाही तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही, असा इशारा काल विरोधकांनी सभागृहात घेतला होता. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि विरोधी आमदार सभागृहामध्ये आक्रमक झाल्यामुळे सभापतींना सभागृहाचे कामकाज चार वेळा तहकूब करावे लागले आहे. आणि त्यानंतरही आमदार आक्रमक राहिल्यामुळे विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं आहे.राज्याच्या ग्रामीण भागातील गरोदर महिला आणि बालकांच्या पोषण व्यवस्थेच्या संदर्भात अंगणवाडी सेविकांचे महत्त्वाचे काम असून, त्यामुळेच अंगणवाडी सेविकांनी संप पुकारल्यास त्यांना 'मेस्मा' लावण्याची तरतूद कायद्यात बदल करून करण्यात आली होती. परंतु आता तो कायदाच स्थगित करण्यात आला आहे.कोणत्याही परिस्थितीत 'मेस्मा' कायदा लावण्याची तरतूद रद्द करता येणार नाही, अशी माहिती ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत दिली. तथापि, या उत्तरामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत सभागृहात गोंधळ घातला होता. राज्यातील अंगणवाडी सेविकांनां लावलेला राज्य सरकारचा "मेस्मा कायदा रद्द" करावा या करीता शिवसेनेच्या आमदारांनी अधिवेशन कामकाज बंद पाडलं होतं. यावेळी खेड तालुक्याचे आमदार सुरेश गोरे यांच्यासह अन्य सदस्यांनी राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला होता. अखेर आज हा कायदा रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत जाहीर केला आहे. 

मेस्मा म्हणजे काय ?मेस्मा म्हणजे महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परीरक्षण अधिनियम 2011चा कायदा आहे. या कायद्यांतर्गत अत्यावश्यक सेवा जाहीर केल्या जातात. हा कायदा लावण्यानंतर त्या विभागातील कर्मचा-यांना संप करता येत नाही. जर तरीही त्यांनी संप केलाच, तर त्यांना अटक होऊ शकते. रुग्णालय, शिक्षण यांच्यासह आरोग्य क्षेत्रासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी हा लागू केला जातो.  

टॅग्स :Mumbaiमुंबई