‘मॅनहोल’मध्ये जाळी बसवा, संभाव्य दुर्घटना टाळा : पालिकेच्या चौकशी समितीची शिफारस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 02:29 AM2017-09-23T02:29:04+5:302017-09-23T02:29:06+5:30
बॉम्बे हॉस्पिटलचे पोटविकारतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले मॅनहोल, स्थानिक नागरिकांनीच उघडून ठेवल्याचे पालिकेच्या चौकशी अहवालातून स्पष्ट झाले आहे.
मुंबई : बॉम्बे हॉस्पिटलचे पोटविकारतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले मॅनहोल, स्थानिक नागरिकांनीच उघडून ठेवल्याचे पालिकेच्या चौकशी अहवालातून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी सहा नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, भविष्यात दुर्घटना टाळण्यासाठी मॅनहोलच्या झाकणाच्या ५ ते ६ इंच खाली, एक जाळीदार झाकण बसविण्याची शिफारस या अहवालात केली आहे.
मुंबईत २९ आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीत अनेक भागांमध्ये पाणी तुंबले. या पाण्याचा निचरा होण्यासाठी शंकर लक्ष्मण मटकर मार्गावर कोणीतरी ‘मॅनहोल’ उघडले होते. या मॅनहोलमध्ये पडून डॉ. अमरापूरकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांच्या अध्यक्षतेत चौकशी समिती स्थापन केली होती. या त्रिसदस्य समितीमध्ये उपायुक्त (सुधार) चंद्रशेखर चोरे व संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) विनोद चिठोरे यांचा समावेश होता. या समितीने आपला अहवाल आयुक्तांकडे सादर केला आहे. मटकर मार्गावर महापालिका कर्मचाºयांनी नव्हे, तर स्थानिकांनी मॅनहोल उघडला होता, अशी भूमिका घेत, या
प्रकरणात पालिकेने आपले अंग झटकले आहे.