शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याचा पारा ४२.१ अंशावर

By admin | Updated: April 22, 2016 01:12 IST

पुण्यासह जिल्ह्याच्या तापमानात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. गुरुवारी शहराचे तापमान ४२.१ अंश सेल्सिअसवर पोहोचले

पुणे : पुण्यासह जिल्ह्याच्या तापमानात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. गुरुवारी शहराचे तापमान ४२.१ अंश सेल्सिअसवर पोहोचले. त्यामुळे आजही पुणेकरांच्या घामाच्या धारा वाहत होत्या. मात्र, पुढील २४ तासांत शहराच्या तापमानात घट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. आज शहराच्या मध्यवर्ती भागाचे तापमान ४० अंश, तर लोहगाव येथील तापमान ४२.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. तापमान ५-६ दिवसांपासून सातत्याने ४१ अंशांच्या घरात राहिल्याने पुण्यात सूर्य आग ओकत असल्याचे चित्र आहे. उकाडा प्रचंड वाढल्याने दुपारी शहरात अघोषित संचारबंदी लागल्याचे चित्र दिसून येत आहे. कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडण्याचे लोक टाळत आहेत. दिवसाच्या तापमानाबरोबर रात्रीच्या तापमानातही वाढ झाल्याने रात्रीही उकाडा जाणवत आहे. किमान तापमान २४.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. या उकाड्यातून पुणेकरांना थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण, पुढील ३ दिवस शहराचे कमाल तापमान घटून ३७ ते ३८ अंशांच्या आणि किमान तापमान १८ ते १९ अंशांच्या घरात येईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.(प्रतिनिधी)