शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

७० बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांचे परवाने धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 06:28 IST

शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने हरभ-याची खरेदी करणा-या शहादा बाजार समितीतील आठ व्यापाºयांचे परवाने मंगळवारी रद्द करण्यात आले. राज्यातील ७० बाजार समित्यांमधील व्यापा-यांनी हमीभावाच्या नियमांचा भंग केल्याने त्यांचेही परवाने धोक्यात आले आहेत.

- रमाकांत पाटील नंदुरबार : शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने हरभ-याची खरेदी करणा-या शहादा बाजार समितीतील आठ व्यापा-यांचे परवाने मंगळवारी रद्द करण्यात आले. राज्यातील ७० बाजार समित्यांमधील व्यापा-यांनी हमीभावाच्या नियमांचा भंग केल्याने त्यांचेही परवाने धोक्यात आले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला.बाजार समित्यांचे दोन दिवसांतील खरेदी दर आॅनलाइनवर तपासल्यानंतर, बहुतांश ठिकाणी हरभºयाची कमी दराने खरेदी झाल्याचे आढळले. ९ एप्रिलला १२१ कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये हरभरा खरेदी झाली. त्यात लातूरमध्ये क्विंटलला सर्वाधिक सहा हजार ९९९ दर मिळाला. अमरावतीत चार हजार ८७ रुपये, नागपूरमध्ये तीन हजार २०० ते तीन हजार ५७० असा भाव मिळाला. लासलगावमध्ये तर हमीभावाच्या निम्म्यापेक्षाही कमी भावाने म्हणजे दोन हजार रुपये क्विंटलने हरभरा खरेदी झाला आहे. शिरपूर, पुणे, दोंडाईचा, माजलगाव, जालना आदी काही बाजार समित्यांमध्ये चार हजार ४०० पासून सात हजारापर्यंतही भाव देण्यात आला. मात्र, काहींनी हमीभावापेक्षा कमी दर दिला. नंदुरबारप्रमाणेच हमीभावापेक्षा कमी दर दिलेल्या बाजार समित्यांच्या व्यापाºयांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे.नियमभंग करणाºया इतर व्यापाºयांवरही तातडीने कारवाई झाली पाहिजे. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना शहादाप्रमाणेच राज्यभर आंदोलन करेल. शेतकºयांची फसवणूक करणाºयांवर कारवाई करण्यास भाग पाडले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवीकांत तूपकर यांनी दिला.हमीभावाचा कायदा काय?हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी केल्यास महाराष्टÑ कृषी उत्पन्न खरेदी-विक्री अधिनियमानुसार कारवाईकरण्याचा अधिकार बाजार समितींना आहे. महाराष्टÑ कृषी उत्पन्न खरेदी-विक्री अधिनियमन १९६३ चा नियम आणि १९६७ मधील ९४ ड (३) यानुसार व्यापाºयांचे परवानेरद्द करण्याचे अधिकार समितींना आहेत. त्याच कायद्यानुसार शहाद्यातील आठ व्यापाºयांचे परवाने रद्द केले आहेत.‘स्वाभिमानी’च्या आंदोलनाचे फलितशहादा बाजार समितीत हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी होत असल्याचे सांगत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चार दिवसांपूर्वी आंदोलन सुरू केले होते.त्याला हिंसक वळण लागल्याने पोलिसांनी शेतकºयांवर लाठीमार केला. त्या विरोधात शेतकºयांनी मंगळवारी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.प्रशासनाने आंदोलनकर्त्यांच्या भावना जाणून काहीलेखी आश्वासने दिली. त्यात शहादा बाजार समितीत हमीभावापेक्षा कमी दराने हरभरा खरेदी करणाºया आठ व्यापाºयांचे परवाने निलंबित केले आहेत.