शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकाऱ्यांना मानसिक आरोग्याचे प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 07:07 IST

राज्यात मानसोपचार तज्ज्ञांची कमतरता लक्षात घेता प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील वैद्यकीय अधिकाºयांना मानसिक आरोग्याच्या उपचाराबाबत

मुंबई : राज्यात मानसोपचार तज्ज्ञांची कमतरता लक्षात घेता प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील वैद्यकीय अधिकाºयांना मानसिक आरोग्याच्या उपचाराबाबत व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचा निर्णय नुकताच राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरणाच्या बैठकीत आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी जाहीर केला. औरंगाबाद जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प राबवावा, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.राज्यात मानसिक आरोग्य सोयी-सुविधा भक्कम करण्यासाठी मानसिक आरोग्य प्राधिकरणाची स्थापना झाली आहे. याअंतर्गत राज्यात जिल्हास्तरीय १५ मानसिक आरोग्य मंडळे स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या अनुषंगाने आरोग्यमंत्र्यांनी मंत्रालयात आढावा बैठक घेतली.आरोग्यमंत्री म्हणाले की, मानसिक आरोग्याची समस्या दिवसेंदिवस वाढत असून त्यावर उपाय आणि समुपदेशनाची आवश्यकता आहे. केंद्र शासनाने केलेल्या मानसिक आरोग्य अधिनियमनाच्या अंमलबजावणीसाठी राज्यात स्थापन करण्यात आलेल्या प्राधिकरणाच्या माध्यमातून यावर कार्यवाही सुरू आहे. राज्यामध्ये मानसोपचार तज्ज्ञांची कमतरता आहे. ती भरून काढण्याकरिता प्राधिकरणातील नामनिर्देशित सदस्यांच्या माध्यमातून व्हर्च्युअल क्लासरूमद्वारे प्राथमिक आरोग्य स्तरावरील वैद्यकीय अधिकाºयांना मानसिक आजारावरील उपचारांचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय या वेळी घेतला.या बैठकीस आरोग्य अतिरिक्त संचालक डॉ. साधना तायडे, ठाणे मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय बोदडे, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अजित दांडेकर आदी या वेळी उपस्थित होते.संस्थांसह रुग्णालयांचीही तपासणीराज्यात स्थापन करण्यात आलेल्या प्राधिकरणात एकूण २० सदस्य आहेत. त्यातील ९ पदसिद्ध सदस्य तर ११ निमशासकीय सदस्य आहेत. ही समिती जिल्ह्यातील मानसिक रुग्णालय, व्यसनमुक्ती केंद्रे, पुनर्वसन केंद्रे अशा मानसिक आजारांवर कार्यरत असणाºया संस्था तसेच रुग्णालयांची तपासणी करणार आहेत.

टॅग्स :docterडॉक्टर