शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या अबोली रिक्षांवर पुरुषांची मक्तेदारी

By admin | Updated: March 31, 2017 04:03 IST

पनवेल परिसरात अबोली रिक्षा चालविणाऱ्या एकमेव महिला चालकाला इतर रिक्षाचालक दमदाटी करीत भाडे स्वीकारू देत

पनवेल : पनवेल परिसरात अबोली रिक्षा चालविणाऱ्या एकमेव महिला चालकाला इतर रिक्षाचालक दमदाटी करीत भाडे स्वीकारू देत नसल्याची तक्र ार वाहतूक शाखा व आरटीओकडे करण्यात आली आहे. पनवेल शहरातील महिला प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या अबोली रिक्षा योजनेत पुरुष रिक्षाचालकांनी अतिक्रमण केले आहे. परिणामी खास महिला चालकांसाठी दिलेले परवाने दिखाऊपणाचा फार्स ठरत असून महिलांच्या नावे खरेदी केलेल्या बहुतांशी अबोली रिक्षा चक्क पुरु ष चालकांमार्फत चालविल्या जात असल्याचे चित्र सध्या पनवेल शहरात दिसत आहे.महिला चालक असलेल्या अबोली रिक्षा शहरात चालवण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने विशेष पुढाकार घेतला. शहरातील महिला प्रवाशांचे सारथ्य करण्यासाठी १० रिक्षांच्या परवान्यांचे पनवेलमध्ये वाटप करण्यात आले. मात्र, नवीन पनवेल (सुकापूर) येथील शालिनी गुरव या एकच महिला ही रिक्षा चालवत आहेत. तर उर्वरित ९ अबोली रिक्षा पुरु ष चालवत आहेत. गुरव यांना पुरु ष रिक्षाचालक भाडे घेण्यास देत नसल्याची तक्र ार गुरव यांनी पनवेल वाहतूक शाखा व आरटीओकडे केली आहे. नवीन पनवेल येथील डी मार्ट, रेल्वे स्थानक, बस स्थानक, ओरीयन मॉल या रिक्षा स्थानकात त्यांना प्रवासी भाडे घेऊन देत नाहीत तसेच आपल्यावर दमदाटी करण्यात येत असल्याचे त्यांनी तक्र ारीत म्हटले आहे. त्यामुळे या रिक्षा चालकांवर कारवाई करण्याची मागणी गुरव यांनी वाहतूक शाखा व आरटीओ कडे केली आहे. अबोली रिक्षा पुरुष रिक्षाचालकाने चालवणे गैर असून कायद्याचा भंग करणारा प्रकार आहे. त्यामुळे हा गैरप्रकार रोखण्यासाठी महिला रिक्षाचालकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन आरटीओने करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)अबोली रिक्षा महिलांनीच चालवावी, असे शासनाचे आदेश असून पुरु षांनी चालवण्यासाठी कोणतीही मोकळीक देण्यात आलेली नाही. पुरु ष रिक्षाचालक अबोली रिक्षा चालवताना दिसत असल्याने परिवहन विभागाकडून कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या रिक्षाचालकांवर ताबडतोब कारवाई करण्यात येईल-विजय कादबाने, पनवेल वाहतूक शाखा, पोलीस निरीक्षक