शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

कोल्हापूरकरांनी दिला आठवणींना उजाळा

By admin | Updated: July 28, 2015 01:29 IST

कलाम यांनी मने जिंकली होती : हरळी, वारणानगर येथील कार्यक्रमात मराठीत संवाद, विद्यार्थ्यांशी गुजगोष्टी, शाहू महाराजांबद्दल व्यक्त केला होता आदर

कोल्हापूर : भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांच्या निधनानंतर कोल्हापूरकरांनी त्यांच्या आठवणींना सोमवारी उजाळा दिला. शिवाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ, वारणा उद्योग समूहाचा सुवर्णमहोत्सव, शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे आयोजित वैज्ञानिक प्रदर्शन आणि हरळी बुद्रुक (ता. गडहिंग्लज) येथील सिम्बायोसिस स्कूलच्या कार्यक्रमांसाठी माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे कोल्हापुरात आले होते. या त्यांच्या दौऱ्यातील आठवणी अद्याप ताज्या आहेत. या दौऱ्यात डॉ. कलाम यांनी मराठीत संवाद साधून कोल्हापूरकरांची मने जिंकली होती.वारणा उद्योग समूहाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली होती. त्यानंतर त्यांनी कोल्हापुरातील शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे आयोजित विज्ञान प्रदर्शनाला भेट दिली. शिवाय विद्यार्थ्यांनी तयार केलेली उपकरणे हाताळून त्यांच्याशी हितगुजदेखील केले होते. डॉ. कलाम यांनी २४ आणि २५ फेब्रुवारी २0१0 या दोन दिवसांच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या भेटीत ३0 शाळांतील सुमारे ५00 विद्यार्थ्यांच्या बरोबर मुक्त संवाद साधून आपण हाडाचे शिक्षक, मार्गदर्शक आहोत याचे प्रत्यंतर घडवले होते. डॉ. कलाम यांच्या कोल्हापूर भेटीत तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख आणि शिक्षक उपसंचालक दिनकर पाटील यांनी त्यांचा विद्यार्थ्यांशी संवाद घडवून आणला होता. शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीत आपण आलो, याचा मनस्वी आनंद होतो आहे, असे ते म्हणाले होते. कोल्हापूर शासकीय विश्रामगृहामध्ये जिल्हा प्रशासनाने स्त्री भ्रूणहत्या विरोधात लेक वाचवा 'अभियानांतर्गत तयार केलेला सेव्ह द बेबी गर्ल डॉट कॉम' हा कार्यक्रम डॉ. कलाम यांनी पाहून कोल्हापूर सारख्या सधन जिल्ह्यात मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी व्हावे हे अशोभनीय आहे मात्र जिल्हा प्रशासनाने तयार केलेला हा उपक्रम संपूर्ण देशास मार्गदर्शक ठरेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क संचालनालयाच्यावतीने प्रसिध्द करण्यात येणाऱ्या लोकराज्य'चे इंग्रजी आणि मराठी भाषेतील अंक तत्कालीन जिल्हा माहिती अधिकारी दयानंद कांबळे यांनी त्यांना सादर केला होता. दर्जा आणि गुणवत्ता पाहून बहुत अच्छे' अशा शब्दात त्यांनी मत व्यक्त केले होते. कागल येथील मध्यवर्ती रोपवाटिका केंद्रासही त्यांनी आवर्जुन भेट दिली होती.याशिवाय राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. वारणानगर येथील कार्यक्रमानंतरही त्यांनी कोल्हापूरात शासकीय निवासस्थानात मुक्काम केला होता. त्यात त्यांनी अनेक लोकांच्याही भेटी घेतल्या. मिशन आविष्कारचे संचालक प्रा. राजेश आगळे आणि आविष्कार विज्ञान केंद्राच्या विद्यार्थ्याशीही त्यांनी संवाद साधला होता. विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात भाषणजानेवारी २००० मध्ये झालेल्या दीक्षांत समारंभासाठी डॉ. कलाम हे प्रमुख उपस्थित होते. तत्कालीन कुलगुरू द. ना. धनागरे यांच्या कारकिर्दीत झालेल्या कार्यक्रमात डॉ. कलाम यांच्या हस्ते ज्येष्ठ शास्त्रज्ज्ञ अनिल काकोडकर यांना सन्मानाची डी. एससी आणि अभिनेते चंद्रकांत मांडरे डी. लिट. पदवी प्रदान करण्यात आली होती. विद्यापीठाच्या मुख्य इमारती मागील जागेत दीक्षांत समारंभाचा कार्यक्रम झाला होता. त्यात डॉ. कलाम यांनी युवकांना प्रेरणादायी असे भाषण केले होते. या सोहळ्यास संशोधन क्षेत्रातील शिक्षक, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी गर्दी केली होती तसेच डॉ. कलाम हे फेब्रुवारी २०१० मध्ये कोल्हापुरात आले होते. आय वुईल फ्लाय ... कविता म्हणून सातारकरांचीही मने जिंकलीआय वुईल फ्लाय ... ही कविता म्हणून घेत आणि दोस्तहो , नमस्कार मला आनंद होत आहे , मी सातारा येथे आलो व मला तुम्हा विद्यार्थ्यांशी संवाद साधता येत आहे. तुम्हाला माझ्या शुभेच्छा...या मराठी वाक्याने भाषणाला सुरुवात करीत डॉ. कलाम यांनी सातारकरांची मने जिंकली होती. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १२६ वी जयंती २२ सप्टेंबर २0१३ रोजी माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थिती साजरी झाली. यावेळी डॉ. कलाम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याच दिवशी कलाम यांच्या हस्ते जिल्हा बँकेतील कोअर बँकिंगचे उद्घाटन झाले.दहा मिनिटांच्या भेटीने विद्यार्थी भारावले...हरळी बुद्रुक (ता. गडहिंग्लज) येथील सिम्बायोसिस स्कूलच्या कार्यक्रमानिमित्त कोल्हापूर विमानतळावर ८ फेब्रुवारी २०१२ रोजी सकाळी पावणे अकराच्या सुमारास डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आले. विमानतळाच्या इमारतीत त्यांच्या भेटीसाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली. इमारतीत त्यांचा प्रवेश होताच त्यांची स्वाक्षरी घेणे तसेच पुष्पगुच्छ देण्यासाठी त्यांच्याभोवती विद्यार्थ्यांनी गराडा घातला. वही, डायरी तर, काही विद्यार्थ्यांनी हातावर डॉ. कलाम यांची स्वाक्षरी घेतली. स्वाक्षरी देत असताना ते हसतमुखाने विद्यार्थ्यांना त्यांचे नाव, शाळा अशा पद्धतीने संवाद साधत होते. त्यांच्या धावत्या भेटीतही विद्यार्थी भारावून गेले.कलाम यांची वारणा कारखान्यास भेट नवे पारगाव : राज्याच्या सहकारातील मानदंड ठरलेल्या श्री वारणा सहकारी साखर कारखान्याच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमासाठी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम मुख्य अतिथी होते. त्यावेळी डॉ. कलाम यांनी वारणा समूहातील विविध संस्थांना भेटी दिल्या. त्यांनी महात्मा गांधी हॉस्पिटल व तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालय व संशोधन केंद्रास भेट दिली. २४ फेबु्रवारी २0१0 रोजी दुपारी हा कार्यक्रम झाला. ग्रामीण भागातील वैद्यकीय शिक्षणासाठी महात्मा गांधी चॅरिटेबल मेडिकल ट्रस्टच्यावतीने केलेल्या कार्याची डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी प्रशंसा केली. वैद्यकीय स्नातकांनी पदवी घेऊन भारताच्या ग्रामीण भागातील रुग्ण सेवेसाठी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी नवे पारगाव येथील तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयात केले.फार मोठा शास्त्रज्ञ, देशभक्त आणि संवेदनशील माणसाला आज आपला देश मुकला आहे. क्षेपणास्त्र कार्यक्रमात माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे मोठे योगदान आहे. ते संरक्षण विभागात काम करत होते, त्यावेळी ते मला भेटत होते. देशाने सशक्त बनले पाहिजे, यासाठी ते प्रयत्नशील होते. त्यांच्या निधनाने केवळ संशोधन क्षेत्राचेच नव्हे, तर संपूर्ण देशाची मोठी हानी झाली आहे. - डॉ. शिवराम भोजे, ज्येष्ठ शास्त्रज्ञमाजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या निधनाने देशाचे मोठे नुकसान झाले आहे. औरंगाबाद येथील एका कार्यक्रमानिमित्त ते आले असताना त्यांना भेटण्याचा योग आला. त्यांनी केमिकल टेक्नॉलॉजी क्षेत्रातील संशोधनाबाबत माझ्या चर्चा केली होती. त्यांच्या निधनामुळे माझ्या कुटुंबातील व्यक्ती हरपला आहे.- डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठजानेवारी २००० मध्ये झालेल्या शिवाजी विद्यापीठातील दीक्षांत समारंभात माझे दीर अभिनेते चंद्रकांत मांडरे यांना डॉ. कलाम यांच्या हस्ते डी. लिट. पदवी प्रदान करण्यात आली होती. त्यावेळी माझे पती सूर्यकांत यांच्यासोबत मीही उपस्थित होते. कलाम अतिशय साधे होते. गर्दीमुळे त्यांच्याशी भेट घेण्याचे राहून गेले, पण त्यांच्यामुळे मी भारावून गेले होते.- सुशिला सूर्यकांत मांडरे,