शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मेहतांचे कुटुंबही आता आरोपांच्या घे-यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 01:41 IST

ताडदेवच्या एमपी मिल कंपाउंडच्या एसआरए योजनेवरून वादाच्या भोव-यात सापडलेले गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या कुटुंबीयांवरही आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घोटाळ्यांचे आरोप केले.

विशेष प्रतिनिधी ।मुंबई : ताडदेवच्या एमपी मिल कंपाउंडच्या एसआरए योजनेवरून वादाच्या भोव-यात सापडलेले गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या कुटुंबीयांवरही आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घोटाळ्यांचे आरोप केले.गृहनिर्माणमंत्री संचालक राहिलेल्या श्री साईनिधी प्रा.लि. या कंपनीने या भूखंडावर एसआरएअंतर्गत घाटकोपरमध्ये लक्ष्मीभुवन आणि गोपालभुवन या जुन्याच चाळींच्या नावाने, दोन नव्या इमारती उभ्या आहेत. या जागेवरील मूळ भाडेकरूंना अजून घरे मिळालेली नाहीत. मात्र, भाडेकरूंच्या यादीत गृहनिर्माण मंत्र्यांचा मुलगा हर्ष प्रकाश मेहता आणि इतर नातेवाईकांना बोगस भाडेकरू दाखवून त्यांना नव्या इमारतीत सदनिका देण्यात आल्या आहेत. भाडेकरूंच्या यादीत गृहनिर्माणमंत्र्यांच्या मुलाचे नाव आहे.गृहनिर्माणमंत्री पूर्वी या कंपनीचे संचालक होते. आता त्यांचे अगदी घनिष्ट मित्र मुकेश दोशी हे आता विद्यमान संचालक आहेत. मुकेश दोशी यांची गृहनिर्माणमंत्र्यांशी किती जवळीक आहे, ते पाहायचे असेल तर विधानभवनाच्या प्रवेशद्वावरील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले पाहिजे. टीव्ही मीडियावर गृहनिर्माणमंत्र्यांचे जे फाइल फुटेज आहे, त्यात मुकेश दोशी मंत्र्यांसोबत विधानभवनात येताना दिसतात, असा आरोप राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.फ्लॅट क्र. ४०३ , सम्यक दर्शन, किरोळ, घाटकोपर हा फ्लॅट प्रकाश मेहतांच्या पत्नी किशोरी मेहतायांच्या नावे आहे. याच बिल्डिंगमध्ये फ्लॅट क्र. ६०१मध्ये या जमिनीचे व बिल्डिंगचे मालक मनीष प्रवीणचंद्र शाह राहतात.त्यांच्याशी गृहनिर्माणमंत्र्यांचा वाद आहे. त्यामुळे या बिल्डिंगमध्ये बेकायदेशीर बांधकाम झाल्याची तक्रार करून गृहनिर्माणमंत्र्यांनी महापालिकेचे कनिष्ठ अभियंता सागर पाटील यांच्यामार्फत या बिल्डिंगचे बिल्डर आणि सर्व सदनिकाधारकांवर ११ मार्च २०१६ पंतनगर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला.यामध्ये एक सदनिकाधारक गृहनिर्माणमंत्र्यांची पत्नीही होती. या कारवाईतून त्यांना वाचविण्यासाठी गृहनिर्माणमंत्र्यांनी पोलिसांवर दबाव आणून पत्नीच्या नावात किशोरी मेहता ऐवजी किशोर मेहता, असे बदलून घेतले, असा आरोप विखे-पाटील यांनी केला.